रमेश विश्राम राणे ट्रस्टच्यावतीने मुरगावतील शिक्षकांचा गौरव

शिक्षण खात्याच्या उपसंचालक ( नियोजन) सिल्विया फर्नांडिस यांनी ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक केले.
सत्कारमूर्तींसह वाल्सला विश्र्वंबरन, भूपेश राणे, गिरिष नाडकर्णी,मारिया कोराडिना परेरा, सिस्टर शोभा, सोनाली पेडणेकर.
सत्कारमूर्तींसह वाल्सला विश्र्वंबरन, भूपेश राणे, गिरिष नाडकर्णी,मारिया कोराडिना परेरा, सिस्टर शोभा, सोनाली पेडणेकर.Dainik Gomantak

दाबोळी: वास्को (Vasco) येथील रमेश विश्राम राणे ट्रस्टने मुरगाव (Margao) तालुका शाळासमूह समितीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुरगाव (Margao) तालुक्यातील पाच शिक्षकांचा (Teachers) गौरव करण्यात आला. शिक्षण खात्याच्या उपसंचालक ( नियोजन) सिल्विया फर्नांडिस यांनी ट्रस्टच्या (Trust) उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे शिक्षकांच्या कार्याची दखल घेतली जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

मांगोरहिलच्या सेंट टेरेझा हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या या नात्याने सिल्विया फर्नांडिस उपस्थित होत्या. व्यासपीठावर गिरीष नाडकर्णी, मुरगाव तालुका विभागीय सहाय्यक शिक्षण अधिकारी वाल्सला विश्र्वंबरन, रोचल नोरोन्हा आंताव, ट्रस्टचे अध्यक्ष भूपेश रमेश राणे, सम्रग शिक्षा अभियानच्या मुरगाव (Margao) विभागाच्या समन्वयक प्रफुलत्ता नाईक, सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ( बायणा) प्राचार्य मारिया कोराडिना परेरा, सेंट टेरेझा हायस्कूलच्या सिस्टर शोभा, सोनाली पेडणेकर होते.

सत्कारमूर्तींसह वाल्सला विश्र्वंबरन, भूपेश राणे, गिरिष नाडकर्णी,मारिया कोराडिना परेरा, सिस्टर शोभा, सोनाली पेडणेकर.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे गोवा सरकार अ‍ॅक्शन मोडवर..!

सडा येथील आशादीप स्पेशल स्कूलचे अमरजीत आत्माराम राऊत, वेळसांवच्या इन्फंट जेसूस अकादमीच्या प्रतिभा गडकरी, वाडेनगर वास्कोच्या सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या पूनम प्रभूदेसाई, झरी सांकवाळच्या आशियाना इन्स्टीट्यूटच्या अंबर मंडलिक, वास्कोच्या (Vasco) विभागीय सहाय्यक शिक्षण अधिकारी रोचल फर्नांडिस यांचा तसेच वास्को विभागीय सहाय्यक शिक्षण कार्यालयातील युडिसी अनिल नावेलकर यांचा गौरव (Pride) करण्यात आला. याप्रसंगी वाल्सला विश्र्वंबरन, रोचेल नोरोन्हा यांनीही राणे ट्रस्टच्या कार्याची स्तुती केली. शिक्षिका हर्षा शेटकर यांनी सूत्रसंचालन केले. भूपेश राणे यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com