Goa Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी तरुण ठरला दोषी; पुढील सुनावणी 10 तारखेला

१८ वर्षांच्या मुलाने 16 वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन केला होता बलात्कार
Court | Goa News
Court | Goa News Dainik Gomantak

राज्यातील एका 16 वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन बलात्कार झाल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. पोलिसांनी कोल्हापूर येथून दोघांनाही ताब्यात घेऊन पीडित मुलीची सुटका केली आणि आरोपीला अटक केली होती.

दरम्यान, 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पणजी येथील जलदगती व पॉक्सो न्यायालयाने 18 वर्षांच्या तरुणाला दोषी ठरवले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 10 जानेवारी रोजी होणार असुन यावेळी संशयित आरोपीला शिक्षा ठोठावली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा निवाडा न्या. दुर्गा मडकईकर यांनी जारी केला आहे.

Court | Goa News
Babu Ajgaonkar: दादागिरी खपवून घेतली जाणार नाही; भाजप नेत्याचा बाबू आजगावकरांना इशारा

तक्रारीत असे नमुद करण्यात आले होते की, आरोपीने 7 सप्टेंबर 2020 रोजी पहाटे पीडित मुलीचे अपहरण केले होते. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संबंधित युवकावर भारतीय दंड संहितेच्या कलम 363 आणि गोवा बाल कायद्याचे कलम 8 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान पोलिसांनी पीडित मुलगी आणि आरोपी युवक यांना 9 सप्टेंबर 2020 रोजी कोल्हापूर येथून ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली. तसेच, आरोपीला अटक केली.

Court | Goa News
Mopa Airport: सर्व पिवळ्या टॅक्सी व्यावसायिकांना स्टँड द्या

दरम्यान, मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर बलात्कार झाल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तरुणाच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 373 अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी युवकाला 15 सप्टेंबर 2020 रोजी 10 हजार रुपयांच्या अटीवर सशर्त जामीन मंजूर केला होता. 

पोलिसांनी तपास पूर्ण करून युवकाच्या विरोधात गोवा बाल कायद्याचे कलम 8 रद्द करून पॉक्सो कायद्याचे कलम 4 लावून 5 नोव्हेंबर 2020 रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी सुनावणी घेऊन पणजी येथील जलदगती व पॉक्सो न्यायालयाने आरोपी युवकाला दोषी ठरविले आहे. आता त्याला 10 जानेवारी रोजी शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com