मडगाव उपनगरीय भागाचा झपाट्याने विकास

 Rapid development of Madgaon suburban area
Rapid development of Madgaon suburban area

नावेली : मडगाव शहरात पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याने मडगाव शहराला जोडून असलेल्या उपनगरीय भागात खास करून फातोर्डा भागात मडगावातील अनेक सरकारी कार्यालये स्थलांतरित करण्यात आली. त्याचबरोबर रवींद्र भवन कदंब बसस्थानक, जिल्हा इस्पितळ, पं. जवाहरलाल नेहरू फुटबॉल स्टेडियम असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प फातोर्डा येथे उभारण्यात आल्याने या उपनगरीय भागाचा झपाट्याने विकास होत आहे.

मडगावात लोकसंख्या वाढत आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, परंतु मडगावात खरेदीसाठी येणाऱ्या वाहनचालकांना मात्र वाहन पार्किंगसाठी जागा मिळत नसल्याने आता लोक मडगाव शहराबाहेर उपनगरीय भागात आज मडगावात मिळणाऱ्या सर्व वस्तू मिळत असल्याने मडगाव शहरात न येता परस्पर खरेदी करतात.


मडगावातील उद्योजक व समाज कार्यकर्ते विवेक नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार मडगावात पार्किंगची समस्या आहे, परंतु ती सोडविण्यासाठी पालिकेकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीत. मडगावात पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्प उभारण्यात येणार असे पाच वर्षांपासून ऐकिवात आहे. मात्र, अजूनपर्यंत प्रकल्प उभारण्यासाठी पाच वर्षांपूर्वी प्रकल्पाची कोनशिला बसविण्यात आली. प्रत्यक्षात कामाला सुरवात झालेली नाही. मडगावात अनेक इमारती उभ्या राहिल्या, परंतु त्यांना पार्किंग नाही. मडगाव शहराचा शिस्तबद्ध पद्धतीने विकास झालेला नाही.


आज अनेक पालक आपल्या मुलांना शाळेपासून महाविद्यालयीन शिक्षण एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे यासाठी ज्या ठिकाणी अशा सुविधा उपलब्ध आहेत त्या भागात घर किंवा फ्लॅट खरेदी करतात व रहातात. कारण मडगाव शहरात दररोज होणारी वाहतुकीची कोंडी या  समस्येला सामोरे जाण्यासाठी लोकांजवळ आता वेळ नाही.


नगरसेवक अविनाश शिरोडकर यांना विचारले असता त्यांनी उपनगरीय भागाचा झपाट्याने  फातोर्डा वेगळी पालिका करण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या पुरस्कृत नगरसेवकांनी सुरवातीच्या काळात मागणी केली होती. फातोर्डा येथे नवीन पोलिस स्थानक, नवीन टपाल कार्यालय सुरू करण्यात आले. त्यानंतर फातोर्डासाठी वेगळी पालिका करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. फातोर्डा वेगळी पालिका झाल्यास सर्व मोठमोठे प्रकल्प फातोर्डा भागात असल्याने मडगाव पालिकेला मिळणारा सर्व महसूल फातोर्डा पालिकेला मिळणार होता. भविष्यात जर फातोर्डा वेगळी पालिका झाली, तर मडगाव पालिकेच्या महसुलावर त्याचा निश्चितच परिणाम होणार आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com