गोव्यात कोरोना पॉझिटिव्हिटी रेटमध्ये झपाट्याने वाढ

गोवा मेडिकल कॉलेजच्या सुपर-स्पेशालिटी ब्लॉकमधील सुमारे सहा वॉर्ड कोविड रुग्णांनी व्यापले आहेत.
COVID-19
COVID-19Dainik Gomantak

पणजी: गोव्यात कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत आहे. राज्यात गुरुवारी 3,728 नवीन कोविड -19 रुग्णांची नोंद झाली. डिसेंबरच्या अखेरीस सुरू झालेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील ही सर्वात मोठी एक दिवसीय वाढ आहे.

COVID-19
Goa Election: गोव्यात राजकीय पक्षांचा 'डिजिटल' प्रचार सुरू

बुधवारी कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 31.85% होता. एका दिवसात त्यात 8% वाढ होऊन तो 39.41% वर पोचला. गेल्या आठवड्यापासून रुग्णालयात (Hospital) दाखल होण्याचे प्रमाण वाढले असून दिवसभरात 43 रुग्ण दाखल झाले तर 12 रुग्णांना घरी सोडण्यात आले. गोवा मेडिकल कॉलेजच्या (GMC) सुपर-स्पेशालिटी ब्लॉकमधील सुमारे सहा वॉर्ड कोविड रुग्णांनी व्यापले आहेत.

COVID-19
'भाजपने आता मॅनिफेस्टो नाही तर 'मनिफेस्टो' जाहीर करायला पाहिजे'

"राज्यात २८ डिसेंबरपासून कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियन्टची (Omicron Variant) लाट सुरू झाली असून ती 20 ते 21 जानेवारीदरम्यान सर्वांत उंचीवर असेल. ही लाट पूर्वीच्या डेल्टा व्हेरिएन्टपेक्षा 3 ते 4 पट अधिक वेगाची असल्याने संक्रमणाचा वेगही जास्त असणार आहे. सध्या राज्यात प्रतिदिन 3 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित सापडत आहेत. पॉझिटिव्हिटी रेटही 30 टक्क्यांच्या वर गेला आहे. यावरून संभाव्य कोरोनाबाधितांचे प्रमाण लक्षात येते. यापूर्वीच्या डेल्टा व्हेरियन्टवर केलेल्या अभ्यासानुसार हा अंदाज आहे, असे मत डॉ. शेखर साळकर यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com