गोव्यातील घनदाट म्हादई अभयारण्याची शान वाढवतेय दुर्मिळ द्विलिंग!

Mhadie.jpg
Mhadie.jpg

पणजी: देशात बऱ्याच ठिकाणी शिवलिंग आहेत. द्विलिंगही आहेत. मोठ्या भक्तिभावनेने त्याची पूजा केली जाते. या द्विलिंगातून प्रकृती आणि पुरुषाच्या मीलनाचे दर्शन घडविले जाते. गोव्यातील (Goa) घनदाट अशा म्हादई अभयारण्यातील (Mhadei Wildlife Sanctuary) एक द्विलिंग सध्या ऐतिहासिक संदेश देत आहे. कदंब राजवटीतील केळघाट या ऐतिहासिक मार्गातील श्रद्धेय ठरलेले हे द्विलिंग जवळपास 700 किंवा 800 वर्षांपूर्वीचे असेल, असा अंदाज ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र केरकर यांनी ‘गोमन्तक’ शी बोलताना व्यक्त केला आहे. (Rare religious idols add to the splendor of the dense Mhadei Wildlife Sanctuary in Goa)

केरकर म्हणाले, की जगात काही भागात द्विलिंग आढळून येतात. परंतु, गोव्यातील द्विलिंगाला एक वेगळा इतिहास आहे. सत्तरीतील करंझोळ गावात दोन दशकापूर्वी एक द्विलिंग आढळून आले होते. ते आम्हीच प्रथम पाहिले. त्याचा अभ्यास केल्यानंतर ते पूजेसाठी पात्रही ठरले होते. परिसरातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने या शिवलिंगाची पूजा करतात. उत्सवही साजरे करतात. कदंब राजवटीतील खानापूरजवळील केळघाट मार्गावरील द्विलिंग जवळपास 800 वर्षांपूर्वीचे असेल, असा माझा अंदाज आहे. 

म्हादई अभयारण्य हे अत्यंत घनदाट असल्याकारणाने या ठिकाणी फार कमी लोक पोहचतात. त्यामुळे ते अनेकांच्या दृष्टीसही पडले नाही. आम्ही गिर्यारोहकांनी ते पाहिेले. गोव्यात असे द्विलिंग अजूनही असतील. मात्र अभयारण्यातील हे द्विलिंग इतिहासकारांचे लक्ष वेधत आहे. त्याची शिवप्रेमींनाही उत्सुकता आहे.

नेमके कुठे
म्हादई अभयारण्यात करंझोळपासून 5 किमी अंतरावर कृष्णापूरमार्गावरील बांदीरवाडा असा भाग आहे तेथे हे द्विलिंग आहे. हा भाग अत्यंत घनदाट असल्याने येथे सहसा कुणीही पोहचत नाही. या भागात धनगर वस्ती आहे. अत्यंत निर्मनुष्य भाग असल्याने येथे सामान्य मनुष्याने पोहचणेही कठीणच आहे. पावसाळ्यात तर हा भाग अत्यंत धोक्याचा असतो. 

द्विलिंगाबद्दल विशेष
 हे द्विलिंग किती वर्षापूर्वीचे असेल हे नेमके सांगता येणार नाही. परंतु, त्याच्या रचनेवरून ते 700 किंवा 800 वर्षांपूर्वीचे असेल असा अंदाज बांधता येतो. 
 या लिंगाची लांबी ही 1 मीटर एवढी आहे. द्विलिंगावरील एक मोठे लिंग 1 फूट उंचीचे आहे तर दुसऱ्या लिंगाची केवळ जागा दिसून येते. अत्यंत काळाकुट्ट असा हा दगड असून तो सुद्धा दुर्मिळ असल्याचा अंदाज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com