शुक्रवारपासून कांद्याची शिधापत्रिकाधारकांना विक्री

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केल्यानुसार राज्याच्या नागरी पुरवठा खात्याच्यावतीने परराज्यातून (लासलगाव-नाशिक) कांद्याची उचल झालेली आहे. तो कांदा दोन-तीन दिवसांत गोव्यात पोहोचणार असून शुक्रवारपासून त्या कांद्याची शिधापत्रिकेवर विक्री सुरू होईल, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी दिली आहे. 

पणजी :  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केल्यानुसार राज्याच्या नागरी पुरवठा खात्याच्यावतीने परराज्यातून (लासलगाव-नाशिक) कांद्याची उचल झालेली आहे. तो कांदा दोन-तीन दिवसांत गोव्यात पोहोचणार असून शुक्रवारपासून त्या कांद्याची शिधापत्रिकेवर विक्री सुरू होईल, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी दिली आहे. 

मंत्री गावडे म्हणाले की, राज्य सरकारकडे आयात करण्यात येणारा कांदा आणि शिधापत्रिकांवर वाटप करण्यासाठी येणारे धान्य यांचा साठा ठेवण्यासाठी पुरेशी जागा आहे. खुल्या बाजारातील कांद्याच्या दराने शंभरी ओलांडल्याने राज्यातील जनतेला स्वस्तात कांदा मिळावा यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वस्तात स्वस्तधान्य दुकानांतून कांदा विक्रीचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी लासलगाव येथून १ हजार ४२ मे. टन कांदा उचल झालेली आहे. सोमवारी सबंधित व्यापारी तो कांदा गोव्याकडे पाठविणार असून पहिल्यांदा दोन ट्रक (४८ टन) कांदा येईल. आयात केलेला कांदा वेळेत दाखल झाला, तर गुरुवारी तो स्वस्तधान्य दुकानांत पोहोचेल आणि शुक्रवारी त्याची विक्री होईल. 
राज्यात साडेतीन लाख शिधापत्रिकाधारक असून प्रत्येक कार्डधारकास तीन किलो या प्रमाणे कांदा मिळणार आहे. राज्य सरकारने कांदा विक्री सुरू केल्याचे जाहीर केले, तर दुसरीकडे बाजारातील शंभरी गाठलेल्या कांद्याचे दर दोन दिवसांत ७० रुपयांवर येऊन पोहोचेले आहेत.

संबंधित बातम्या