Rasha Thadani: ...म्हणून रवीना टंडनची लेक गोव्यात आलीय, विमानतळावर फोटोग्राफरने विचारले मिठाई कधी?

राशा थडानी गोव्याला येत असताना विमानतळावर पापाराझींनी तिला घेराव घातला आणि मिठाईची मागणी केली.
Raveena Tandon's Daughter Rasha Thadani in Goa
Raveena Tandon's Daughter Rasha Thadani in GoaDainik Gomantak

Raveena Tandon's Daughter Rasha Thadani in Goa: रवीना टंडनची मुलगी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. मुलगी उत्तीर्ण झाल्याबाबतची अपडेट रवीनाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. रवीनाने तिच्या मुलीचे बालपणीचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले.

रवीनाची मुलगी राशा थडानी मुंबईतील धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होती. दरम्यान, राशा दहावी पास झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी गोव्यात आली आहे.

बुधवारी राशा थडानी गोव्याला येत असताना विमानतळावर पापाराझींनी तिला घेराव घातला आणि राशाकडे मिठाईची मागणी केली.

पापाराझीने राशाला विचारले की ती कुठे जात आहे? असे विचारले त्यावर तिने गोव्याला जात असल्याचे सांगितले. त्याचवेळी दुसऱ्या एका फोटोग्राफरने तिचे, अभिनंदन करत मिठाई दिली नाहीस. असे विचारले.

त्यावेळी राशाने 'पुढच्या वेळी नक्की..' असे उत्तर दिले. तसेच, पुढे जाऊन काजू कतली चालेल का? असेही तिने विचारले.

Raveena Tandon's Daughter Rasha Thadani in Goa
China's deep-Earth exploration: चिनी वैज्ञानिक पृथ्वीवर खोदतायेत 10,000 मीटर खोल खड्डा, पण कारण काय?

राशा थडानी तिच्या मैत्रिणींसोबत गोव्यात आली आहे. विमानतळावर ती काळ्या टँक टॉप आणि निळ्या पॅंटमध्ये राशा क्युट दिसत होती.

राशासोबत विमानळावर तिच्या मैत्रिणी देखील दिसत आहेत. सर्वजण गोव्यात निकाल आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले आहेत.

रवीनाच नाही तर अलिकडे अनेक बॉलीवूड स्टार्सची मुले दहावीसह, पदवी उत्तीर्ण होत आहेत. अलीकडे जुही चावलाची मुलगी जान्हवी, माधुरी दीक्षितचा मुलगा रियान, संजय कपूर आणि महीप कपूरचा मुलगा जहाँ कपूर हे तिघेही पदवीची परीक्षा देत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com