प्रकृतीबद्दल रवी नाईक यांनी केला खुलासा

दैनिक गोमंतक
गुरुवार, 1 एप्रिल 2021

रवी नाईक यांच्या प्रकृती मध्ये  बिघाड झाल्याने त्यांना सकाळी दोनपावलच्या मणिपाल इस्पितळात दाखल केल्याची माहिती मिळाली होती.

फोंड्याचे आमदार आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या प्रकृती मध्ये  बिघाड झाल्याने त्यांना सकाळी दोनपावलच्या मणिपाल इस्पितळात दाखल केल्याची माहिती मिळाली होती. त्यांना ब्रेन स्ट्रोकचा सौम्य धक्का बसल्याचे सांगितले जात होते. मात्र आमदार रवी नाईक यांनी आता स्वतःच याबद्दल खुलासा केला असल्याचे समजते. (Ravi Naik reveals about health)

"आपण नियमित तपासणीसाठी दोनापावलच्या  मणिपाल इस्पितळात आलेलो असून, आपली प्रकृती उत्तम आहे." असे ट्विट फोंड्याचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री रवि नाईक यांनी केले आहे. नाईक हे आजारी पडल्याने त्यांना इस्पितळात हलविण्यात आल्याची माहिती समाज माध्यमावर सुरुवातीला पसरली होती. त्याबाबत त्यांनी म्हटले आहे की, कृपया हितचिंतकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. माझी प्रकृती धडधाकट आहे. मी नियमित तपासणीसाठी मणिपाल इस्पितळात आलेलो आहे.

गोवा: ''भाजप सरकारची सामान्यांप्रती असंवेदनशीलता उघड''

रवी नाईक (Ravi Naik) हे काँग्रेसचे (Congress) आमदार असून ते गोव्याचे (Goa) माजी मुख्यमंत्री देखील आहेत. असे असतानाही राजेश वेरेकर या युवा नेत्याला काँग्रेसने अलीकडे फोंड्यात पक्षात प्रवेश दिलेला आहे. त्याशिवाय रवी नाईक यांच्या दोन्ही मुलांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे.

संबंधित बातम्या