मडगाव रवींद्र भवन संस्थेला अपेक्षित अनुदान मिळणार; सगुण वेळीप

रवीन्द्र भवन मडगावची शनिवारी सर्वसाधारण कौन्सिल बैठक पार पडली.
मडगाव रवींद्र भवन संस्थेला अपेक्षित अनुदान मिळणार; सगुण वेळीप
GrantsDainik Gomantak

फातोर्डा : सरकारकडून अपेक्षित अनुदान (Grants) लवकरात लवकर रवींद्र भवन मडगावला (Ravindra Bhavan Madgaon) मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्र्वासन कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप यांनी दिले. रवीन्द्र भवन मडगावची शनिवारी सर्वसाधारण कौन्सिल बैठक पार पडली. यावेळी वेळीप बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रवीन्द्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक हे होते. तर सदस्य सचिव संध्या कामत यांच्यासह कौन्सिलचे सभासद उपस्थित होते.

Grants
‘त्या’ हल्लेखोरांना त्वरित अटक करा; गिरोडकर

गोवा स्वातंत्र्याचे 60 वे वर्ष साजरे करत असताना त्यानिमित्त रवीन्द्र भवन तर्फे गोव्याच्या परंपरेवर आधारीत लोकनृत्य व संगीत स्पर्धा, पाय तियात्रिस्टाच्या जयंती दिनी काताराची स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच मागच्या बैठकीतील इतिवृत्तांताल व हिशोबाच्या ताळेबंदाला मान्यता देण्यात आली.

गतवर्षी कोरोना आणि आर्थिक कारणामुळे काही निश्‍चित कार्यक्रम रद्द झाले होते. मात्र, झालेल्या कार्यक्रमांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. बैठकीत स्वामी विवेकानंद केंद्र, बायोमेट्रिक मशीन, तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती, हाऊस किपिंग कर्मचाऱ्यांचा प्रश्र्न यावरही चर्चा करण्यात आली. शिवाय पुढील कार्यक्रमाच्या रुपरेषेबरोबरच विविध विषयांवर मंथन करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com