गोमंतकीयाने सुरु केलेल्या 'रिअल' ब्रॅंडला तब्बल 50 वर्ष पुर्ण होणार

गोमंतकीयाने सुरु केलेल्या 'रिअल' ब्रॅंडला तब्बल 50 वर्ष पुर्ण होणार
real soda.jpg

पणजी: शिरोडकर कुटुंबीयांच्या गेल्या 2-3 पिढ्यांनी वाढवत नेलेला रिअल समूह गोमंतकीयांना अनेक सेवा देत आहे. 6 जून 1972 रोजी रिअल ड्रिंक्स प्रा. लि. च्या माध्यमातून "रिअल सोडा उत्पादनास प्रारंभ झाला. मागील आठवड्यात या उत्पादनाने आपली 49 वर्षे यशस्‍वीरीत्‍या पूर्ण करून सुवर्णमहोत्‍सवी वर्षात पदार्पण केले आहे. या कंपनीचे संस्थापक स्व. गजानन शिरोडकर यांनी आपल्या उत्पादनांना ''रिअल'' हे नाव दिले आणि पुढच्या काळात याच नावाने त्यांची उत्पादने गोव्यात लोकप्रिय झाली. (The 'Real' brand started by goan man in Goa will complete 50 years)

आज ''रिअल'' हे नाव सर्वतोमुखी आहे. याच स्व. गजानन शिरोडकरांनी अजून एक उत्पादन चालू केले व त्यास आपल्या मातोश्री माणिकताई गणू शिरोडकर यांच्या नावाखाली रिअल माणिक असे नाव दिले. रिअल सोडा व रिअल समूह हा काळाबरोबर चालत असल्याने त्यांनी उद्योगांसाठी असलेले आयएसओ सर्टिफिकेशन मिळवून आपल्या उत्पादनांना प्रमाणित केले आहे. 

केवळ सोड्यासारखी जलपेये यावरच न थांबता कॅफे रिअलसारखे रुचकर डिशेस देणारे रेस्टॉरंट, रिअल ड्रिंक्स, रिअल फूड एक्स्पोर्ट्स, रिअल हाऊस व बॉटलिंग, एजन्सी रिअल, रिअल एजन्सीज व पार्टीजसाठी हॉल अशा अनेक सेवा हा समूह गोमंतकियांना पुरवीत आहे. स्व. गजानन शिरोडकरांनी स्थापन केलेल्या या कंपनी समूहाला स्व. दिलीप शिरोडकरांनी भव्य आकार देण्यासाठी अपार कष्ट केले आणि कंपनीला विकासाच्या वाटा निर्माण करून दिल्या. गोव्यात जे उद्योग समूह झाले आहेत. त्यात रिअल समूहाचे वेगळे व परंपरेने जपलेले स्थान आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com