Red Stone Mining : पिसुर्लेत चिरेखाण मालकावर गुन्हा नोंदविण्याची शिफारस

सत्तरी तालुक्यातील बेकायदेशीर चिरेखाणीवर खाण खात्याची विशेष नजर राहणार आहे‌.
Stone carving
Stone carvingDainik Gomantak

Red Stone Mining : सत्तरी तालुक्यातील बेकायदेशीर चिरेखाणीवर खाण खात्याची विशेष नजर राहणार आहे‌. दोन दिवसांपूर्वी खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनी पिसुर्ले येथील बेकायदेशीर चिरेखाणीवर धाड घातली. मात्र सदर ठिकाणी व्यवहार बंद असल्यामुळे कारवाई करता आली नाही.

सदर ठिकाणी व्यवसाय बंद असल्यामुळे कोणत्याही प्रकारची मशिनरी अथवा सामान जप्त केलेले नाही. मात्र सदर ठिकाणी नव्याने चिऱ्याखाणीचा व्यवसाय सुरू झाला असून या संदर्भाची रीतसर तक्रार वाळपई पोलिस स्थानकात सादर करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी चिरेखणींचा व्यवसाय बेकायदेशीर सुरू आहे सदर जमीन मालकावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस खाण अधिकाऱ्यांनी केली आहे.

Stone carving
Jyoti Kunkolienkar : लेकीनंतर आईलाही ‘साहित्य अकादमी’चा बहुमान

30 पेक्षा जास्त बेकायदेशीर चिरेखाणीचा व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू आहे. पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असून या संदर्भात कडक कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी वारंवारपणे करण्यात आली. मात्र त्याकडे अजूनपर्यंत विशेष लक्ष देण्यात आलेले नाही. हनुमंत परब म्हणाले, पिसुर्ले गावातील बेकायदेशीर खाणी बंद करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. आता पाहणी करुन गुन्हा दाखल केला असला तरी जोपर्यंत ह्या खाणी बंद होत नाहीत तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com