चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या प्राण्यांच्या निवाऱ्याची पुन्हा उभारणी 

चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या प्राण्यांच्या निवाऱ्याची पुन्हा उभारणी 
animal shelter.jpg

अरंबोल : गेल्या आठवड्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने (tauktae cyclone) राज्याच्या किनारपट्टी भागाचे प्रचंड नुकसान झाले होते. यात मोठमोठ्या घरांसह प्राण्यांच्या निवाऱ्याचेही (Animal Shelter)  प्रचंड नुकसान झाले होते. मात्र चक्रीवादळानंतर काही दिवसांतच मिशन रॅबीज गोवाने (Mission Rabies Goa)  प्राण्यांच्या निवाऱ्यांची  पुन्हा नव्याने उभारणी केली आहे.  तौक्ते चक्रीवादळ अतिवृष्टी, जोरदार वारा यासर्वांमुळे अरंबोल येथे जनावरांच्या निवाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे अनेक जनावरे घाबरून गेली होती. मात्र  मिशन रॅबीज गोवा च्या स्वयंसेवकांनी  काही दिवसात कोसळलेल्या निवाराच्या पुनर्बांधणी करत प्राण्यांच्या निवारा उभरला आहे.  (Reconstruction of a cyclone-ravaged animal shelter) 

“चक्रीवादळ, जोराच्या वाऱ्यामुळे  प्राण्यांच्या निवाऱ्याभोवतालची अनेक झाडे  उन्मळून पडली होती. तर छतांचेही नुकसान झाले होते. हे पाहून आम्हाला खरोखरच जोरदार धक्का बसला,  असे आय लव गोवा डॉग्स संस्थेच्या (I Love Goa Dogs Institute)  एका स्वयंसेवकांने  सांगितले.  उद्ध्वस्त झालेल्या निवाऱ्यामध्ये  या निवाऱ्यात 40 ते 50 कुत्री भटकी कुत्री असतात. निर्जंतुकीकरणासाठी त्यांना याठिकाणी आणले जाते. निर्जंतुकीकरण झाल्यानंतर त्यांची काळजी घेतली जाते आणि नंतर सोडण्यात येते. गेल्या रविवारी या निवारामध्ये केवळ 14 कुत्री होती. वाऱ्यामुळे निवाऱ्यांचे छत पडले होते. या छताखाली काही प्राणी अडकले होते. मिशन रेबीज गोवाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर मिशनच्या स्वयंसेवकांनी तिथे जात त्यांची सुटका केली.  

सुदैवाने यावेळी निवाऱ्यात कोणतेही मांजरांचे पिल्लू नव्हते.  जनावरांचा निवारा कोसळल्यानंतर आमच्या पथकाने  त्या दिवशी अडकलेल्या कुत्र्यांना वाचवले आणि त्यानंतर काही दिवसातच निवाऱ्याची पुनर्बांधणी केल्याची माहिती  मिशन रॅबीज गोवाचे  संचालक, मुरुगन अप्पूप्लाई यांनी दिली.  प्राणी या निवाऱ्यात परत येण्यासाठी चक्री वादळामुळे झालेले नुकसान आणि मोडतोड  हळूहळू साफ केली जात आहे.   वादळा मुळे  निवाऱ्यावर कोसलेली सर्व झाडे बाजूला करण्यात आली आहेत.  ज्या लोकांना आम्ही यापूर्वी कधीच भेटलो नाही परंतु प्रतिष्ठेने ओळखतो असे लोकही आम्हाला मदत करण्याची ऑफर  देत आहेत, असे एका स्वयंसेवकाने सांगितले आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com