गोव्यात राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या पुनर्बांधणीला सुरवात

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

राजधानी पणजीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाच्या उद्‍घाटनानंतर आझाद मैदानावर झालेल्या जाहीर सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, गोव्यात पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी आजपासून सुरवात झाली आहे.

पणजी : राजधानी पणजीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाच्या उद्‍घाटनानंतर आझाद मैदानावर झालेल्या जाहीर सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, गोव्यात पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी आजपासून सुरवात झाली आहे. मागील निवडणुकीपूर्वी काँग्रेसने युती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार व मी स्वतः चर्चा केली होती. मात्र शेवटपर्यंत काँग्रेसने झुलवत ठेवत निर्णय घेतला नाही. निवडणुकीनंतरही काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी गोवा फॉरवर्ड व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याचे ठरविले होते. मात्र, काँग्रेसमध्ये असलेल्या मतभेदामुळे भाजपने बाजी मारली. काँग्रेसने जर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर निवडणुकीपूर्वी युती केली असती बहुमत मिळाले असते व कोणाच्याही पाठिंब्याची गरज भासली नसती. काँग्रसने तर गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक केली याचा मी साक्षीदार आहे. यामधून राष्ट्रवादी काँग्रेसने धडा घेतला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व सरचिटणीस प्रफुल्ल पटेल म्हणाले. 

या जाहीर सभेच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवा प्रभारी नरेंद्र वर्मा, आमदार चर्चिल आलेमांव, प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, पक्षाचे नेते प्रफुल्ल हेदे, सतीश नरयाणी, सँड्रा मार्टिन्स, नेली रॉड्रिग्ज, ॲड. अविनाश भोसले, संजय बर्डे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.  

जनहिताला प्राधान्‍य : वर्मा
पक्षाचे गोवा प्रभारी नरेंद्र वर्मा म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसला गोव्यात समाजकारण करायचे आहे. लोकांच्या हितासाठी त्यांच्याबरोबर राहायचे व पाठिंबा देण्याचे काम करणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूतोवाचप्रमाणे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण असे पक्षाचे ध्येय आहे. लोकांना जे प्रकल्प नको आहेत त्याला पक्षातर्फे जोरदार विरोध केला जाईल असे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा : 

भाजप सरकारने गोव्याला केले दिवाळखोर ; काँग्रेसच्या गिरीश चोडणकरांचा आरोप 

अनेकदा आंदेलने करूनदेखील खासगी बस मालकांच्या मागण्या अपूर्णच ; वाहतूक अधिकाऱ्यांना आज पुन्हा घेराव घालत विचारला जाब 

गुजरात, मुंबई-दिल्लीकरांना आवडे गोवा.. 

 

संबंधित बातम्या