राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत वाढ

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

१ तारखेला राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८४.०४ होती. ती हळहळू वाढत ८५.९८ वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत ३७ हजार १०२ संक्रमित रुग्णांपैकी ३१ हजार ९०२ लोक बरे झाले आहे.

पणजी- राज्यात ऑक्टोबर महिन्याची सुरूवात किंचितशी दिलासादायक ठरली आहे. १ तारखेला राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८४.०४ होती. ती हळहळू वाढत ८५.९८ वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत ३७ हजार १०२ संक्रमित रुग्णांपैकी ३१ हजार ९०२ लोक बरे झाले आहे.

दरम्यान, कोरोनामुळे मागील २४ तासांत ७ जण दगावले असून एकूण मृतांचा आकडा ४८४ वर पोहोचला आहे. आरोग्य सेवा संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १,४०३ जणांचे नमुणे चाचणीसाठी घेण्यात आले. त्यात ४३२ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ८२ जणांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले.

मागील २४ तासांत ७ जण दगावले. त्यात  ताळगाव येथील ६० वर्षीय महिला, दोना पावला येथील ३८ वर्षीय महिला, पर्वरी येथील ५० वर्षीय पुरुष, कांदोळी येथील ६५ वर्षीय पुरुष, काणकोण येथील ८४ वर्षीय पुरुष, अंजुना येथील ५८ वर्षीय महिला आणि नुवे येथील ७२ वर्षीय महिलेचा समावेश 
आहे.

संबंधित बातम्या