दिलासादायक..!; राज्यात कोरोना रूग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढतीच

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

आज १ हजार ३४६ जणांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले. ४३२ जण पॉझिटिव्ह आढळले. १७४ जणांना घरगुती विलगीकरणात राहण्यास परवानगी मिळाली आहे. ६४ जणांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. ४२६ जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना मागील २४ तासांत घरी सोडण्यात आले आहे.

पणजी- राज्यात कोरोना रूग्णांच्या मृत्यूसंख्येने पाचशेचा टप्पा ओलांडला आहे. मागील चोवीस तासांत राज्यात आठ जण दगावले. एका बाजूला बळींची संख्या चिंतेची बाब बनली असताना रुग्ण बरे होण्याची वाढणारी टक्केवारी (८६.५४ टक्के) काही अंशी दिलासा देणारी 
आहे. 

आज १ हजार ३४६ जणांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले. ४३२ जण पॉझिटिव्ह आढळले. १७४ जणांना घरगुती विलगीकरणात राहण्यास परवानगी मिळाली आहे. ६४ जणांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. ४२६ जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना मागील २४ तासांत घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत रुग्ण बरे झालेल्यांची संख्या ३३  हजारच्या (३३,२०३) पार गेली आहे. राज्यभरात अॅक्टिव पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या ४ हजार ६५६ एवढी आहे. 

मागील चोवीस तासांत जे ८ जण दगावले आहेत, त्यातील ७ जणांचा मृत्यू गोमेकॉत झाला आहे. तर एकाचा मृत्यू म्हापशाच्या आझिलो रुग्णालयात झाला आहे. मृतांमध्ये फोंडा येथील ७४ वर्षीय पुरुष, कामुर्ली येथील ८० वर्षीय महिला, बोक दी व्हॉक (पणजी) येथील ७० वर्षीय महिला, पेडणे येथील ६८ वर्षीय पुरुष, फोंडा येथील ८० वर्षीय पुरुष, आगशी येथील ४९ वर्षीय पुरुष, साखळी येथील ७१ वर्षीय पुरुष आणि म्हापसा येथील ५८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

कार्यक्षेत्रात २०० पेक्षा जास्त रूग्ण असलेली आरोग्य केंद्रे

 पर्वरी.......    .....२९८
मडगाव    .........२९७
चिंबल    ..........२८६
वास्को    ..........२६३
साखळी    .........२५३
म्हापसा    .........२३७
फोंडा    ...........२३४
कांदोळी    .........२२९
 

संबंधित बातम्या