Covid-19 Goa: कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण पोहोचले 93.11 टक्क्यांवर; कोरोना परीस्थितीचा सविस्तर आढावा

covid19 Report.jpg
covid19 Report.jpg

पणजी: कोविड काळात जून महिना गोव्यासाठी दिलासा देणारा ठरत असून 1 जून ते 5 जून या पाच दिवसांत 3324 नवे कोरोनाबाधित सापडले तर त्याच्या दुपट्टीपेक्षा जास्त 7776 कोरोना रुग्ण (Covid-19 Patients) बरे झाले आहेत. कोरोनामुळे होणारे मृत्यूही कमी होत आहेत. राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना पॉझिटिव्हिटी दर बराच खाली आला असून आज तो 13.72 टक्के एवढा आहे. तर कोरोनाबाधित (Covid-19 Positive) बरे होण्याचे प्रमाण वाढले असून आज 93.11  टक्के एवढे झाले आहे. चोवीस तासात कोविडमुळे 17 जणांचा मृत्यू झाला. (Recovery rate from Covid19 in Goa reached 93.11 per cent)

गेल्या चोवीस दिवसांमध्ये तब्बल 24 हजार 737 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. त्याच बरोबर इस्पितळापेक्षा घरात अलगीकरणात राहून बरे होणाऱ्या कोरोना बाधितांची संख्याही वाढलेली असून इस्पितळात दाखल होणाऱ्या पेक्षा डिस्चार्ज देणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे राज्यासाठी हा मोठा दिलासा ठरत आहे . 

आरोग्य खात्याने आज दिलेल्या माहितीनुसार आज  4134 कोरोना चाचणी करण्यात आल्या. आज जाहीर झालेल्या अहवालानुसार 567 नवे कोरोनाबाधित आज सापडले असून 1433 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सक्रिय कोरोना बाधितांची संख्या १० हजाराखाली आलेले असून आज ती 8216 एवढी आहे. आज  जे 576 कोरोनाबाधित सापडले त्यातील  465 कोरोनाबाधितांनी घरीच अलगीकरणात राहून कोरोनावर उपचार घेण्याचे ठरवले तर 102 कोरोना बाधित इस्पितळात दाखल झाले. त्याच बरोबर 99 कोरोनाबाधितांनी इस्पितळातून डिस्चार्ज घेतलेला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com