राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा..!

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ८८.४१ वर पोहोचले आहे. दरम्यान, मागील चोवीस तासांत सहाजण दगावले असून, कोरोनामुळे एकूण बळींची संख्या ५२५ झाली आहे. 

पणजी- राज्यातील कोरोनाचे बळी बरे होण्याच्या वाढत्या प्रमाणामुळे एकप्रकारे दिलासा मिळत आहे. मागील चोवीस तासांत ४३० जण प्रकृती सुधारल्यामुळे घरी परतले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत पॉझिटिव्ह सापडलेल्या ३९ हजार ७७० रुग्णांपैकी ३५ हजार १६१ रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ८८.४१ वर पोहोचले आहे. दरम्यान, मागील चोवीस तासांत सहाजण दगावले असून, कोरोनामुळे एकूण बळींची संख्या ५२५ झाली आहे. 

दिवसभरात १ हजार ५८२ जणांचे नमुणे चाचणीसाठी घेण्यात आले. ३३२ जण नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची आज भर पडली. १७३ जणांना घरगुती विलगीकरणार राहून उपचार घेण्यात परवानगी मिळाली आहे. त्याशिवाय आज ४१ जणांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. राज्यात एकूण ॲक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ८४ एवढी नोंदली गेली आहे. सहा जणांच्या मृतामंध्ये मडगाव येथील ६२ वर्षीय पुरुष, करंझाळे येथील ७० वर्षीय महिला, डिचोली येथील ७४ वर्षीय पुरुष आणि साव जुझे दे आरियल येथील ६० वर्षीय महिला, उत्तर गोव्यातील ८० वर्षीय पुरुष आणि ४५ वर्षीय अनोळख्या व्यक्तीचा समावेश आहे.राजधानी पणजीत गेली काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मागील काही आठवड्यांपूर्वी राजधानीत दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांची संख्या ४० ते ४५ अशी असायची. परंतु सध्या ही संख्या २० च्याखाली आली आहे. त्यामुळे राजधानीत घटत असलेली कोरोना पॉझिटिव्ह आढळणा

संबंधित बातम्या