पुढील वर्षी १० हजार नोकर भरती

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

 भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी समीर मांद्रेकर यांची आज नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, भाजयुमोचे मावळते प्रदेशाध्यक्ष प्रमेय माईणकर, प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात पुढीलवर्षी सरकार १० हजार जणांची नोकरभरती करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

पणजी: भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी समीर मांद्रेकर यांची आज नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, भाजयुमोचे मावळते प्रदेशाध्यक्ष प्रमेय माईणकर, प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात पुढीलवर्षी सरकार १० हजार जणांची नोकरभरती करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, सरकारमधील नोकरभरतीसाठी जानेवारीत जाहिराती दिल्या जातील. त्यानंतर १० हजार जणांची भरती सरकारच्या प्रशासनात केली जाणार आहे. युवा वर्गाचा रोजगाराचा प्रश्न सरकार सोडवणार आहे. भाजपचे सरकार हे युवकांचे, शेतकऱ्यांचे आणि सामान्यातल्या सामान्यांचे आहे. सद्या राज्यात विरोधासाठी विरोध केला जातो. राज्य व देश प्रगतीपथावर असताना भाजप पुन्हा सत्तेवर येऊ नये यासाठी जनतेची दिशाभूल करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवभारताचे निर्माण होणार आहे. स्वयंपूर्ण गोवा योजनेतून पंचायत पातळीवर मनुष्यबळ विकास करणे सुरु झाल्याने विरोधक बिथरले आहेत. 

तानावडे म्हणाले, दत्तप्रसाद खोलकर, विनय तेंडुलकर आदी भाजयुमोचे पूर्वी अध्यक्ष होते. ते किंवा त्यानंतर झालेल्य प्रदेशाध्यक्षांनी पक्षाचे काम पुढे नेले आहे. केवळ अमुक एका कुटुंबातील म्हणून भाजपमध्ये नियुक्ती मिळत नाही. समीर यांनाही त्यांच्या कर्तत्वावर हे पद मिळाले आहे. ते पुढील तीन वर्षे या पदावर असतील. मांद्रेकर यांनी विद्यार्थी दशेतच आपण भाजपचे काम कसे सुरु केले होते याची माहिती दिली.

संबंधित बातम्या