Staff Nurse Recruitment: गोवा मेडिकल कॉलेजमध्ये 571 पदांची भरती

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये फार्मासिस्ट पदांसाठी या www.gmc.goa.gov.in अधिकृत वेबसाईटवर अधिसूचना जारी केली आहे
Staff Nurse Recruitment: गोवा मेडिकल कॉलेजमध्ये 571 पदांची भरती
Staff Nurse RecruitmentDainik Gomantak

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने (Goa Medical College) स्टाफ नर्ससह (Staff Nurse) विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छूक उमेदवार या पदांसाठी 18 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. ही पदभरती 571 रिक्त पदांसाठी केली जाईल.

उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.gmc.goa.gov.in वर जारी केलेली अधिसूचना पूर्णपणे वाचल्यानंतरच या पदांसाठी अर्ज करावा. उमेदवारांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, केवळ नियमांनुसार केलेला अर्ज वैध मानला जाईल. तेव्हा या सुचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

GMC भरती 2021: रिक्त पदांची संख्या

मल्टी-टास्किंग स्टाफ-94 पोस्ट

लोअर डिवीजन लिपिक-13 पोस्ट

मेडिकल रेकॉर्ड लिपिक-6 पोस्ट

ज्युनियर स्टेनोग्राफर-1 पोस्ट

स्टाफ नर्स-378 पोस्ट

ऑक्युपेशनल थेरपिस्ट-4 पोस्ट

फिजिओथेरपिस्ट-4 पोस्ट

स्पीच थेरपिस्ट-2 पोस्ट

मेडिको सोशल वर्कर - 5 पोस्ट

सीनियर टेक्निशियन - 3 पोस्ट

ऑर्थोपेडिक असिस्टंट - 2 पदे

ज्युनिअर टेक्निशियन - 13 पोस्ट

रेडियोग्राफिक टेक्निशियन - 4 पोस्ट

फार्मासिस्ट - 9 पोस्ट

ईसीजी टेक्निशियन - 3 पदे

प्रयोगशाळा सहाय्यक - 3 पोस्ट

प्रयोगशाळा टेक्निशियन - 4 पोस्ट

बार्बर - 1 पोस्ट

डायलिसिस तंत्रज्ञ - 4 पदे

Staff Nurse Recruitment
Goa Recruitment: राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांची भरती

GMC भरती 2021: शैक्षणिक पात्रता

मल्टी-टास्किंग स्टाफच्या पदासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तर स्टाफ नर्स पदासाठी उमेदवाराकडे बीएससी नर्सिंगची पदवी असणे आवश्यक आहे. फिजिओथेरपिस्ट पदासाठी उमेदवाराला 12 वी उत्तीर्ण असणे तसेच संबंधित विषयात डिप्लोमा केलेला असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर फार्मासिस्ट पदासाठी उमेदवाराकडे बी.फार्मा पदवी असणे आवश्यक आहे.

GMC भरती 2021: वयोमर्यादा:

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्याचबरोबर सरकारच्या नियमांनुसार एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांनाही वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे.

Staff Nurse Recruitment
Goa Recruitment: ‘GHRDC’मध्ये रोजगाराच्या संधी!

GMC भरती 2021: निवड प्रक्रिया

या विविध पदांवर उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. उमेदवार या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी जारी केलेली अधिकृत अधिसूचना वेबसाइटवर जावून पाहू शकतात.

GMC भरती 2021: महत्वाच्या तारखा

अधिसूचना जारी करण्याची तारीख - 8 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 ऑक्टोबर 2021

Related Stories

No stories found.