'गोव्यातील पंचायत निवडणुकीनंतर होणार नोकरभरती'

वीजमंत्री सुदिन ढवळीकर : संपूर्ण राज्यातील पथदीपांचे खांब बदलण्याचे काम हाती घेणार
'गोव्यातील पंचायत निवडणुकीनंतर होणार नोकरभरती'
Sudin Dhavalikar Dainik Gomantak

साळ: राज्यात वीज खात्यामार्फत भरीव कामगिरी होत असून एकूण दोनशे कोटी रुपये खर्चून भूमिगत वीजवाहिन्या घालण्याच्या योजनेस सुरवात झाली आहे. 100 कोटींची मांद्रे मतदारसंघातील भूमिगत वीज वाहिन्यांची योजना कार्यान्वित झाली आहे. लवकरच आमोणे व फोंडा येथेही तीस कोटींची भूमिगत वीजवाहिन्यांची योजना सुरू करण्यात येणार आहे. राज्यात एकंदर चार लाख पथदीप आहेत. त्यांच्या देखभालीसाठी व खांब बदलण्यासाठी नोकरभरतीची आवश्यकता आहे. त्यामुळे पंचायत निवडणुकीनंतर वीज खात्यात 251 जणांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

Sudin Dhavalikar
'गोवा शिपयार्ड नोकरभरतीत होत आहे घोटाळा'

साळ येथे 19 कोटी रुपये खर्चून नवीन वीज उपकेंद्र उभारले असून त्याचे उद्‍घाटन व वीज प्रवाह सुरू करण्याचा कार्यक्रम वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते नुकताच पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वाहतूक व पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, साळचे सरपंच घनश्याम राऊत, मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस, कार्यकारी अभियंता वल्लभ सामंत, उपसरपंच वर्षा साळकर तसेच बिंदिया राऊत, प्रकाश राऊत, वासुदेव परब, देविदास नाईक, वासुदेव हळर्णकर, सहाय्यक अभियंता निळकंठ सावंत, रामचंद्र च्यारी, कनिष्ठ अभियंता विनोद धोंड, रामा सावंत, ठेकेदार रोहन गर्ग उपस्थित होते.

प्रत्येक मतदारसंघात नवीन वीज उपकेंद्र, ट्रान्स्फॉर्मर बदलणे आदी कामे चालू झाली आहेत. सर्व पंचायत क्षेत्रातील विविध योजनेअंतर्गत पथदीप आहेत ते एका महिन्यात वीज खात्याच्या अंतर्गत येणार आहेत. प्रत्येक उपकेंद्रात पथदीपांची निगा राखण्यासाठी एक कनिष्ठ अभियंता, चार-पाच लाइनमन किंवा मदतनीस नेमण्यात येणार आहेत. संपूर्ण राज्यातील पथदीपांचे खांब बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे, असेही ढवळीकर पुढे म्हणाले.

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, की आज वीज ही जीवनदायिनी बनली असून त्याद्वारे आपण राज्याचा विकास घडवून आणू शकतो. साळ व आजूबाजूचा परिसर कृषिप्रधान आहे. येथे कृषी व दुग्ध उत्पादने यावर भर द्यावा व आपला ब्रँड तयार करावा. देशाबाहेर ‘मेड इन गोवा’ची उत्पादने निर्यात करण्यासाठी प्रयत्न करावा. आमदार शेट्ये यांनी सांगितले, की डिचोली मतदारसंघात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असून त्यासाठी लाटंबार्से औद्योगिक वसाहतीत लहान तसेच मोठे उद्योग आणण्यासाठी वीज, पाणी, रस्ता वाहतुकीचे जाळे उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. गोवा सरकार याची दखल घेईल तसेच कृषी क्षेत्राला विकसित करण्यासाठी आपणही सतत पाठपुरावा करणार आहे.

Sudin Dhavalikar
‘मडगाव अर्बन बॅंके’च्‍या ठेवीदारांना दिलासा

‘शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा योजनेचा लाभ घ्यावा’

साळ व आजूबाजूचा परिसर कृषिप्रधान असून येथील शेतकरी कष्टकरी आहे. त्याला योग्यरीतीने योग्य दिशा दाखवली, तर येथे सौर ऊर्जा निर्मिती होऊ शकते. सौर ऊर्जा उपकरणांसोबत शेतकऱ्यांना पंप देण्याची योजना सरकारने आखली आहे. त्यात शेतकऱ्याला 90 टक्के अनुदान मिळू शकते. फक्त दहा टक्के शेतकऱ्यांनी रक्कम भरली पाहिजे. कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा उत्पादित करण्याचा विचार करावा व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीजमंत्री दिन ढवळीकर यांनी केले.

‘ऊर्जा निर्मितीसाठी नागरिकांची साथ हवी’

तयार करणारी उपकरणे बसवण्याचे काम चालू आहे. तसेच फर्मागुढी येथील गोवा इंजिनिअरिंग कॉम्प्लेक्समध्येही सौर ऊर्जा निर्मितीची योजना आहे. सौर ऊर्जा निर्मितीसाठी अनेक कारखानदारही पुढे येत आहेत. येत्या दहा वर्षांत विजेबाबत गोव्याचे चित्र बदललेले दिसेल. त्यासाठी नागरिकांनी योग्य साथ द्यावी, असे आवाहन ढवळीकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.