Monsoon: गोव्यात 14 जुनला ‘रेड अलर्ट’ 

Monsoon: गोव्यात 14 जुनला ‘रेड अलर्ट’ 
heavy rain.jpg

पणजी: सोमवारी राज्यात अतिवृष्टी आणि पुरसदृश स्थितीची दाट शक्यता असल्याने ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांनी अधिक दक्षता घ्यावी, असे हवामान वेधशाळेने म्हटले आहे. (Red alert tomorrow due to heavy rains in Goa)

राज्यात मान्सून स्थिरावला असून पावसाचा जोर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी अतिवृष्टीमुळे  जनजीवन विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. भूस्खलन आणि पूर येणाऱ्या भागातील नागरिकांनी अधिक दक्षता घ्यावी. तसेच सरकारने संभाव्य परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय योजावेत, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

शनिवारी सकाळच्या प्रहरात राज्यात पावसाने जोरदार सलामी दिली. दिवसभर उसंत घेतल्यानंतर पुन्हा पावसाने सायंकाळी रिपरिप सुरू केली. राज्यात पुढील 24 तासात सुमारे 204.4 मिमी पावसाची नोंद शक्य असून वाऱ्याचा वेग प्रतितास 40 किमी इतका असेल दरम्यान, रविवारपासून पावसाचा जोर आणखी वाढेल. सोमवारी राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. भूस्खलन आणि पुराची शक्यता असलेल्या भागातील नागरिकांना तसेच प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे संशोधक एम. राहूल म्हणाले.

कोकणाला इशारा
बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com