Goa Raj Bhavan: राजभवनावर रक्त चंदन उद्यान; राज्यपालांनी केले वृक्षारोपण

70 हून अधिक झाडांची लागवड
Planted The Saplings Of Sandalwood At Raj Bhavan Goa
Planted The Saplings Of Sandalwood At Raj Bhavan GoaDainik Gomantak

Red Sandalwood Garden And Planted The Saplings Of Sandalwood At Raj Bhavan Goa: आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाची औषधी वनस्पती म्हणून गणल्या गेलेल्या आणि पूर्व किनारपट्टीवर आढळणाऱ्या दुर्मिळ रक्तचंदनाची लागवड राजभवनावर करण्यात आले असून रक्तचंदन उद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानात राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी या वेगळ्या जातीच्या रक्त चंदनाच्या झाडाचे वृक्षारोपण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्तच्या प्रकल्पाचा भाग म्हणून रक्त चंदन उद्यान या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन राज्यपालांनी राजभवनात केले. राजभवन आणि वनविभागाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी राज्यपालांची पत्नी के. रिटा पिल्लई, राज्यपालांचे सचिव एम.आर.एम. राव, उपवनसंरक्षक प्रवीण राघव, वनसंरक्षक सौरभकुमर, तेजस्विनी पुसुलुरी, क्लिफा डिकोस्टा, मारियाना उपस्थित होते.

Planted The Saplings Of Sandalwood At Raj Bhavan Goa
International Coastal Clean-up Day: मिरामार बीचवर खासदार नाईक यांचा स्वच्छता कार्यक्रमात सहभाग, गोयकरांना आवाहन

हे रक्त चंदन उद्यान साकार करणाऱ्यांचे आभार मानत राज्यपाल पिल्लई म्हणाले की, पर्यावरण जागरूकता वाढवण्यासाठी असे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. रक्तचंदन हे आयुर्वेदातील महत्त्वाची वनस्पती आहे अशा प्रकल्पामुळे समाजात जनजागृती होईल आणि त्याचा लाभही होईल.

आपल्या किनाऱ्यावर दुर्मिळ लागवड

रक्त चंदन उद्यान हा राज्यपालांचा उल्लेखनीय उपक्रम असून मौल्यवान लाल चंदनाच्या लागवडीला आणि संवर्धनाला चालना देणारा आहे. हा प्रकल्प पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.

लाल चंदनाच्या झाडाला सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यावरणीय महत्त्व आहे आणि ही बाग पुढील पिढ्यांसाठी या प्रतिष्ठित प्रजातीचे जतन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. यापूर्वी त्यांनी फणस आणि वामन वृक्षवटीका उभारली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com