Valpoi Garbage Issue: वाळपई-रेडेघाटात कचऱ्याचे ढीग

वाळपईतील रेडेघाट रस्त्याच्या बाजूला वारंवारपणे अज्ञात व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात असल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त होत आहे.
Garbage Issues
Garbage IssuesDainik Gomantak

Valpoi Garbage Issue: म्हाऊस पंचायत क्षेत्रातील नागवे येथील वाळपईतील रेडेघाट रस्त्याच्या बाजूला वारंवारपणे अज्ञात व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात असल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त होत आहे.

वाळपई-होंडा रस्त्याच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला रेडेघाट येथे मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीकडून कचरा फेकला जात आहे. या कचऱ्यामुळे सदर परिसर कचऱ्याने दाटलेला असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच हा टाकाऊ कचरा भटकी गुरे खात आहे.

या कचऱ्यामुळे परिसर प्रदूषित होत असल्याने नागरिकांकडून संबंधित पंचायतीला विचारणा करण्यात येते.

यासंबंधी काल सकाळी म्हाऊस पंचायतीचे सरपंच सोमनाथ काळे यांनी भेट देऊन येथे उद्‍भवलेल्या परिसराची पाहणी करून माहिती दिली. ते म्हणाले, हा परिसरात म्हाऊस पंचायत क्षेत्रात येत असून रात्रीच्या वेळीच कचरा टाकण्याचा प्रकार होत आहे.

Garbage Issues
Child Beggars: म्हापशात भिक मागणाऱ्यांची चाईल्डलाईनतर्फे सुटका

आम्ही पंचायतीतर्फे येथे कचरा टाकू नये, म्हणून वारंवारपणे जनजागृती केली जाते. त्याचप्रमाणे या ठिकाणी कचरा टाकू नये, असे फलक सुध्दा लावण्यात आला होता. मात्र जो फलक अज्ञाताकडून लंपास करण्यात आला आहे.

तसेच हा प्रकार जो कोणी करत आहे. त्यांच्यावर लवकरच ठोस कारवाई करण्यात येणार. आता जनजागृती करण्याची खरीच गरज असून आपली परिसरात साफ ठेवणे ही प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com