पहिली ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात ३०% कपात : 'एससीईआरटी’चा निर्णय

पहिली ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात ३०% कपात : 'एससीईआरटी’चा निर्णय
Reduction in 30% syllabus for 1st to 8th standard

पणजी : यंदाच्या चालू शैक्षणिक वर्ष २०२० - २१ साठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) घेतला असून, त्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. विस्तृत विचारविनिमयानंतर अभ्यास मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
अभ्यासक्रमातून जो भाग वगळण्यात आला आहे, तो सत्रासाठी किंवा परीक्षेसाठी घेतला जाणार नाही. भाषा व कौशल्य विषयातील अभ्यासक्रमाचा भाग कमी करण्यात आलेला नाही. कोणकोणत्या अभ्यासक्रमातील विषयाचा भाग कमी केला आहे, त्याची सविस्तर माहिती सर्व शाळांना परिपत्रक पाठवून देण्यात येईल.शाळांना विद्यार्थ्यांना आत्म अभ्यासासाठी प्रोत्साहित करण्यास सांगितले जाते. 

जुलैच्या सुरवातीस गोवा बोर्डाने इयत्ता ९ वी ते बारावीच्या अभ्यासक्रमात ३० टक्के कपात केली होती. शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी सरकार सध्या समाजातील घटकांशी सल्लामसलत करीत आहे. एससीईआरटीने इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विषयांमधील विद्यार्थ्यांचे मंडळ स्थापन केले आहे आणि शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी ३० टक्के पर्यंत अभ्यासक्रम कमी करण्यासाठी कोणते धडे घेणे शक्य आहे, याची चाचपणी करण्यास सांगितले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com