राज्य सरकारने प्रकाल्पाबाबत गोमंतकीय जनतेची जागृती करावी...

 Regarding the project of the center Awareness should be created among the people
Regarding the project of the center Awareness should be created among the people

मुरगाव: गोव्यात साकारण्यात येणाऱ्या केंद्राच्या तीन प्रकल्पांना होत असलेला वाढता विरोध लक्षात घेता आता राज्य सरकारने पुढाकार घेऊन हे प्रकल्प भविष्यात किती फायदेशीर ठरू शकतात, हे जनतेला पटवून सांगावे लागेल,  जनतेत जागृती निर्माण करावी, असे मत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.


वास्कोत एका खासगी दौऱ्यावर आयुषमंत्री आले होते. तेव्हा त्यांना पत्रकारांनी गाठून तीन प्रकल्पाविरोधात चाललेल्या जनक्षोभ विषयी विचारले असता त्यांनी लोकांना प्रकल्पाच्या बाबतीत समजावून सांगण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.


रेल्वे दुपदरीकरण, मोले वीज प्रकल्प आणि रस्ता रुंदीकरण या तीन प्रकल्पांविरोधात गोमंतकीय जनता पेटून उठली आहे. हे तिन्ही प्रकल्प कोळसा कंपन्यांचे हित जपून गोव्यात थाटत आहे, अशी भावना जनतेची बनली आहे. एक प्रकारे गोव्याला कोळसा हब बनविण्याचा केंद्र सरकारचा इरादा आहे, असे गोमंतकीय जनतेचे म्हणणे बनले आहे.


केंद्र सरकारचे तिन्ही प्रकल्प किती फायदेशीर राहील, हे गोमंतकीय जनतेला राज्य सरकारने पटवून देणे आवश्यक आहे, त्याचसाठी सरकारने लोकांबरोबर बातचीत करावी. प्रकल्पांची सविस्तर माहिती, फायदा-तोटा यावर खुलासा करणे गरजेचे आहे, असे आयुषमंत्री म्हणाले.
राज्याचा विकास साधताना थोडेफार नुकसान सोसावेही लागणार आहे. पर्यावरणाची थोडीफार हानी होईल, पण, भविष्याचा विचार करून हे तीनही प्रकल्प गोव्यात उभारले जात आहे, असे श्री. नाईक म्हणाले.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com