वाहन दस्ताऐवज वैधतेबाबत ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

मोटार वाहनसंदर्भातील विविध दस्तऐवजांच्या वैधतेला १ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ केली आहे यासंदर्भातचा आदेश वाहतूक खात्याचे संचालक राजन सातार्डेकर यांनी काढला आहे. यामुळे ज्या मोटार वाहन चालकांची वैधता संपली आहे ती आता वर्षअखेरीपर्यंत ग्राह्य धरली जाणार आहे.

पणजी : मोटार वाहनसंदर्भातील विविध दस्तऐवजांच्या वैधतेला १ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ केली आहे यासंदर्भातचा आदेश वाहतूक खात्याचे संचालक राजन सातार्डेकर यांनी काढला आहे. यामुळे ज्या मोटार वाहन चालकांची वैधता संपली आहे ती आता वर्षअखेरीपर्यंत ग्राह्य धरली जाणार आहे. 

कोविड पार्श्‍वभूमीवर गोवा सरकारने ज्यांच्या वाहनाच्या विविध दस्तऐवजाच्या वैधतेची मुदत १ फेब्रुवारी २०२० पर्यंत संपली होती त्यांना वाहतूक खात्यामध्ये येऊ लागू नये त्यात वेळोवेळी मुदतवाढ केली होती. मात्र कोरोना महामारीचे प्रमाण कमी होत नसल्याने ही मुदतवाढ केली होती. अजूनही त्याचे प्रमाण कमी होण्याची लक्षणे दिसत नसल्याने वाहतूक खात्यात वाहनाच्या विविध दस्ताऐवजाच्या वैधतेची मुदत वाढविण्यासाठी येणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन वाहतूक खात्याने त्यात पुन्हा वाढ केली आहे.

त्यामध्ये वाहनाचा फिटनेस दाखला, सर्व प्रकारची परमिटस्, वाहन चालक परवाना, नोंदणी व इतर दस्तऐवजांचा समावेश आहे. ‘कोविड-१९’च्या पार्श्‍वभूमीवर रस्ता व वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून तो सर्व राज्यांना लागू केला आहे.

संबंधित बातम्या