Goa Election: रेजिनाल्ड काँग्रेस मध्येच राहणार, वाढदिवशी घोषणा

विरोधी पक्षनेते कामत (Opposition leader Digambar Kamat) यांनी रेजिनाल्ड (Alex Reginald Lawrence) पक्ष सोडून जाणार नाहीत याची आपल्याला मनोमन खात्री होती. त्यांच्या या निर्णयाने पक्षाचे मनोबल अधिक मजबूत झाले आहे
काँग्रेसला (Congress) रामराम करून आम आदमी पक्षात (Aam Aadmi Party) प्रवेश करणार अशी जी चर्चा चालू होती त्याला आमदार लॉरेन्स यांनी आज त्यांच्या वाढदिनी विराम दिला.
काँग्रेसला (Congress) रामराम करून आम आदमी पक्षात (Aam Aadmi Party) प्रवेश करणार अशी जी चर्चा चालू होती त्याला आमदार लॉरेन्स यांनी आज त्यांच्या वाढदिनी विराम दिला. Dainik Gomantak

मडगाव: गोव्यातील (Goa) स्थानिक काँग्रेस (Congress) नेतृत्वाला कंटाळून कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Alex Reginald Lawrence) हे काँग्रेसला रामराम करून आम आदमी पक्षात (Aam Aadmi Party) प्रवेश करणार अशी जी चर्चा चालू होती त्याला आमदार लॉरेन्स यांनी आज त्यांच्या वाढदिवशी विराम दिला. आपण काँग्रेस सोडून जाणार नाही तर काँग्रेसमध्ये राहूनच भाजपला (BJP) विरोध करणार हे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसला (Congress) रामराम करून आम आदमी पक्षात (Aam Aadmi Party) प्रवेश करणार अशी जी चर्चा चालू होती त्याला आमदार लॉरेन्स यांनी आज त्यांच्या वाढदिनी विराम दिला.
Goa Election: सांताक्रुझ मतदारसंघात भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत शक्य

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या बरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रेजिनाल्ड यांनी ही घोषणा केली. गोव्याला भाजपपासून वाचवायचे हे एकमेव ध्येय ठेवून आपली पुढील वाटचाल असेल असे त्यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी लॉरेन्स हे पक्षाचे महत्त्वाचे नेते असून ते पक्षाचा चेहरा आहेत. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिले असून भविष्यात त्यांना त्यांना पक्षात मानाचे पद दिले जाईल असे सांगितले.

विरोधी पक्षनेते कामत यांनी रेजिनाल्ड पक्ष सोडून जाणार नाहीत याची आपल्याला मनोमन खात्री होती. त्यांच्या या निर्णयाने पक्षाचे मनोबल अधिक मजबूत झाले आहे असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com