‘त्या’ महसूल अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा 

विलास महाडिक
शुक्रवार, 10 जुलै 2020

बोगस पदवी प्रमाणपत्र रेमंड फर्नांडिस यांनी सादर केल्याप्रकरणी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा न दिल्यास दिनदयाळ उपाध्याय यांच्या तत्‍वांची भाषा बोलणाऱ्या भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी,

पणजी

अव्वल कारकून पदासाठी निवड करताना रेमंड फर्नांडिस याच्या बोगस पदवी प्रमाणपत्र दस्तऐवजाची महसूल खात्यातील ज्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून ती अधिकृत असल्याची शिफारस केली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. या बोगस पदवी प्रमाणपत्रप्रकरणी त्याचे वडील उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा देण्याची मागणी गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस व प्रवक्ते प्रशांत नाईक यांनी केली.  
बोगस पदवी प्रमाणपत्र रेमंड फर्नांडिस यांनी सादर केल्याप्रकरणी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा न दिल्यास दिनदयाळ उपाध्याय यांच्या तत्‍वांची भाषा बोलणाऱ्या भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली. रेमंड फर्नांडिस याचे पदवी प्रमाणपत्र बोगस असल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर त्याची अव्वल कारकून पदासाठी झालेली निवड उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली होती. या बोगस पदवी प्रमाणपत्राबाबत रेमंड फर्नांडिस याचे वडील असलेले सभापती इजिदोर फर्नांडिस माहीत नसणे अशक्य आहे, असे नाईक म्हणाले. 
यापूर्वी राज्यात गुणवाढ प्रकरण तसेच लैंगिक अत्याचार प्रकरणातील आमदार व मंत्र्यांना लोकांनी घरी पाठवले होते. त्यामुळे इजिदोर फर्नांडिस यांनी त्यापूर्वीच त्यांना पदाचा राजीनामा द्यावा. अव्वल कारकून पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक दाखल्यांची
माहिती माहिती हक्क कायद्याखाली घेण्यात आली आहे व त्यातील काहींचे दाखले संशयास्पद तसेच वादग्रस्त असून त्याची छाननी सुरू असल्याचे नाईक यांनी सांगितले. 
 

संबंधित बातम्या