''शिवरायांमुळे धर्म आणि संस्कृती टिकून राहिली''- सभापती राजेश पाटणेकर
rajesh.jpg

''शिवरायांमुळे धर्म आणि संस्कृती टिकून राहिली''- सभापती राजेश पाटणेकर

डिचोली: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि समस्त जनतेचे प्रेरणास्थान असलेल्या शिवरायांमुळे धर्म आणि संस्कृती टिकून राहिली. प्रत्येकाने शिवरायांचा आदर्श नजरेसमोर ठेवतानाच, आजच्या युवापिढीने त्यांचे विचार आचरणात आणणे, ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी, अशी डिचोली शहराची ओळख आहे. त्यामुळे डिचोलीवासियांना (dicholi) शिवरायांबद्दल अभिमान तेवढाच आदर असल्याचेही सभापती पाटणेकर यावेळी बोलताना म्हणाले.  शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा केल्यानंतर सभापती श्री. पाटणेकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी', आदी घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत रविवारी डिचोलीतील शिवप्रेमींनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला.(Religion and culture survived because of Shivaraya Speaker Rajesh Patnekar)

सर्वप्रथम डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित, डिचोलीचे नगराध्यक्ष पुंडलिक फळारी (Pundalik Falari) आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सभापती पाटणेकर यांनी जुन्या बसस्थानकावरील शिवरायांच्या अर्ध पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवरायांना वंदन केले. नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळयाला पुष्पहार अर्पण करून महापुरुष शिवरायांना अभिवादन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सतिश गावकर, नगरसेवक विजयकुमार नाटेकर, दीपा शेणवी शिरगावकर, दीपा पळ आणि निलेश टोपले तसेच डॉ. शेखर साळकर, डॉ. कौस्तुभ पाटणेकर, विकास गावस, कृष्णा पळ आदी शिवप्रेमी उपस्थित होते.  

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com