गोव्यात ''या'' ठिकाणी मिळणार रेमडेसिव्हिर इंजेक्शन

Remdisivir injection
Remdisivir injection

पणजी: केंद्र सरकारने गोव्यातील वाढलेल्या कोरोना (Goa Corona) रुग्णांची दखल घेऊन कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन (Oxygen) पुरवठ्यासाठी  उपयुक्त ठरणारे 200 कॉन्सट्रेटर्स  गोव्याला प्रदान केले आहेत. आज विमानातून हे सर्व कॉन्सट्रेटर्स गोव्यात दाखल झाले. त्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr.Pramod Sawant) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत. गोव्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी व ऑक्सिजनचा योग्य पुरवठा करण्यासाठी हे कॉन्सट्रेटर्स उपयुक्त ठरतील. गोव्याची गरज लक्षात घेऊन पंतप्रधानांनी यापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार गोव्याला कॉन्सट्रेटर्स  प्रदान केले त्याबद्दल आपण पंतप्रधानांचे आभार व्यक्त करतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.(Remdisivir will be available at this place in Goa)

दरम्यान, गोव्यातील विविध इस्पितळांमध्ये  कोरोनावर उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित नागरिकांना रेमेडिसीवर इंजेक्शनची (Remdisivir) कमतरता भासू नये यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील आठ एजन्सीशी संपर्क साधून रेमेडीसीवर इंजेक्शन पुरवण्याचे  कंत्राट दिले आहे. आपत्कालीन वापरासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने रेमेडिसीवर इंजेक्शन पुरवण्याची जबाबदारी त्या एजन्सीकडे दिलेली असून त्या एजन्सीच्या यादीसोबत त्यांचा संपर्क क्रमांक व पत्ता जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील या एजन्सी राज्यात ज्या ज्या ठिकाणी कोरोना रुग्णावर उपचार चालू आहेत त्या सर्व इस्पितळांना  रेमेडिसीवर हे महत्त्वाचे असलेले इंजेक्शन उपलब्ध करणार आहेत.  

रेमेडिसीवर पुरवणाऱ्या एजन्सी व संपर्क क्रमांक
सांबारी  इंटरप्रायजेस  मडगाव - 8888612836
द्रोगारिया अनंता, पणजी -  9422059369
मेसर्स रायकर डिस्ट्रीब्युटर्स मडगाव -  9579651779 
मेसर्स जी. एन. एजन्सीज, म्हापसा- 8600993789
मेसर्स द्रोगारिया कोलवाळकर, म्हापसा - 9822100449    
मेसर्स लिवूम फार्मा, मंगेशी -  8007001811  
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com