विजेच्या खांबावरील अमित शहांचे बॅनर काढा; युवक काँग्रेसची मागणी

युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी गुरुवारी विद्युत भवनात निवेदन सादर करताना भाजपवर कारवाई करण्याची मागणी केली
Goa Congress Youth President Varad Mardolkar
Goa Congress Youth President Varad MardolkarDainik Gomantak

पणजी: गोवा प्रदेश युवक काँग्रेसने (Goa youth congress) गोव्याच्या मुख्य विद्युत अभियंत्याला निवेदन सादर केले असून, भारतीय जनता पक्षाने (BJP) विजेच्या खांबावर अमित शहा यांचे लावलेले बॅनर आणि पोस्टर्स (BJP Banners and Posters) काढण्याची विनंती केली आहे.

Goa Congress Youth President Varad Mardolkar
गोव्यात यावेळी सत्ताबदल होणारच : संजय राऊत

युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी गुरुवारी निवेदन सादर केले आणि भाजपवर कारवाई करण्याची मागणी केली. तद्‌नंतर त्यांनी पणजीतील विद्युत भवनाबाहेर पत्रकार परिषद घेवून ही मागणी केली. यावेळी काँग्रेस नेते जनार्दन भंडारी, साईश आरोसकर आदी उपस्थित होते.

भाजपने बॅनर प्रदर्शित करण्याची परवानगी मागितली होती का, याचे उत्तर देण्यात सरकारी अधिकारी अपयशी ठरले आहेत. यामुळे हे अधिकारी भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जेव्हा आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले तेव्हा मुख्य विद्युत अभियंताने या विषयावर मौन बाळगले होते. " असे ॲड म्हार्दोळकर म्हणाले.

Goa Congress Youth President Varad Mardolkar
Goa Politics: समविचारी पक्षांना युतासीठी 'भाजपा'ची दारे खुली

भारतीय जनता पक्षाने आपल्या सत्तेचा गैरवापर केला आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे बॅनर आणि पोस्टर्स विमानतळ- ते कूर्टी फोंडा आणि धारबांदोडा पर्यंत, आणि फोंडा आणि वास्को येथून पणजीच्या वाटेवर लावले आहेत. अमित शाह यांच्या गोवा भेटीवर त्यांचे स्वागत करण्यासाठी हे बॅनर्स लावले आहेत, परंतू सरकारी मालमत्तेचा वापर करणे हे चुकीचे आहे असे म्हार्दोळकर म्हणाले.

ॲड. म्हार्दोळकर म्हणाले की, भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी आणि अमित शाहला खूश करण्यासाठी सरकारी मालमत्तेचा वापर केला आहे. ‘‘पोस्टर्स आणि बॅनर लावण्यासाठी विजेचे खांब वापरण्याची परवानगी नाही.’’ असे ते म्हणाले.

Goa Congress Youth President Varad Mardolkar
कोरोना काळात डॉक्टरच देवाच्या रुपात आले

"मी विद्युत विभागाला विनंती करतो की त्यांनी त्यांच्या अभियंत्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना विद्युत खांबावर लावलेले सर्व होर्डिंग्ज, पोस्टर्स आणि इतर बॅनर त्वरित हटवावेत." अशी मागणी त्यांनी केली.

म्हार्दोळकर म्हणाले की, भाजपने या कृतीतून आपली दादागिरी संस्कृती दाखवली आहे आणि यासाठी गोव्यातील लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले. “राजकीय फायद्यासाठी सरकारी मालमत्तेचा वापर करणे योग्य नाही. सरकारी अधिकाऱ्यांनी भाजपच्या दबावाखाली न येता कारवाई केली पाहिजे. ” असे म्हार्दोळकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com