डिचोलीत घरे शाकारणीची कामे जोरात

Dainik Gomantak
बुधवार, 13 मे 2020

पावसाळा तोंडावर आल्याने आता डिचोलीतील विविध भागात घरे शाकारणीची कामे जोरात सुरु असल्याचे आढळून येत आहे. यंदा मात्र 'टाळेबंदी'मुळे कामगारांची कमतरता भासत असून, कामगार सांगतात तेवढी मजूरी द्यावी लागत आहे

डिचोली

पावसाळा तोंडावर आल्याने आता डिचोलीतील विविध भागात घरे शाकारणीची कामे जोरात सुरु असल्याचे आढळून येत आहे. यंदा मात्र 'टाळेबंदी'मुळे कामगारांची कमतरता भासत असून, कामगार सांगतात तेवढी मजूरी द्यावी लागत आहे. काही भागात स्थानिक कारागीर ही कामे करताना दिसून येत आहे. टाळेबंदीमुळे सोशल डिस्टंन्शिंगचे पालन करुन शाकारणीची कामे करावी लागत आहेत. आता बाजारात प्लास्टीकही उपलब्ध होत असल्याने पावसाच्या झडीपासून बचाव करण्यासाठी घरांना प्लास्टीकची आच्छादने घालण्याची लागबगही सुरु झाली आहे. दरवर्षी मान्सूनचे वेध लागताच, सर्वत्र मान्सूनपूर्व कामांकडे नागरिक लक्ष केंद्रीत करीत असतात. काळ बदलला असला, तरी आजही डिचोली शहरासह तालुक्‍यातील ग्रामीण भागात कौलारु घरांची संख्या कमी नाही. काही भागात तर आजही गावठी कौलारु घरे आढळून येतात. पावसाच्या पाण्याची गळती लागू नये, यासाठी बहूतेकजण दरवर्षी पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच कौलारु घरांची दुरुस्ती आणि शाकारणी करण्याच्या कामाकडे वळतात. बहूतेक ग्रामीण भागात तर घरांबरोबरच ग्रामीण भागात गोठे शाकारणीचीही कामे करावी लागतात. टाळेबंदीमुळे सध्या कामगार मिळणे दुरापास्त झाले आहे. मिळालेच यंदा त्यांची मजूरीही वाढलेली आहे. त्यामुळे नागरिकांसमोर प्रश्‍न निर्माण झाला आहे. तरीसुध्दा पावसाळ्यापुर्वी घरे शाकारणीची कामे करण्यावाचून अन्य पर्याय नाही. दरम्यान, 'टाळेबंदी' मुळे गेल्या महिन्यापर्यंत प्लास्टीकची अनुपलब्धता निर्माण होती. त्यामुळे पावसाच्या झडीपासून बचाव करण्यासाठी घरांना प्लास्टीकची आच्छादने घालण्याची कामे खोळंबली होती. आता आयडीसीत प्लास्टीकचे उत्पादन करणारे कारखाने सुरु झाल्याने, त्यातच बाजारातही प्लास्टीक उपलब्ध होत असल्याने जनतेची गैरसोय दूर झाली आहे.

goa goa goa

संबंधित बातम्या

Tags