जीर्ण जलवाहिन्या बदला ः उपसभापती फर्नांडिस

सुभाष महाले
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

लोलये पंचायत क्षेत्रातील पाणी समस्या निकालात काढण्यासाठी तीन महिन्यांच्या आत जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या घाला, अशी सूचना उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी जलपुरवठा खात्याच्या अभियंत्यांना केली. 

काणकोण

लोलये पंचायत क्षेत्रातील माशे, दापट, माड्डीतळप व शेळी भागाला दरवर्षी डिसेंबर पासूनच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यावर उपाय योजना करण्यासाठी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी आज (मंगळवारी) दापट-माशे येथील गॉड गिफ्टस सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी लोलये-पोळे पंचायतीचे सरपंच निशांत प्रभुदेसाई, उपसरपंच जेसिका कोर्त, पंच सचिन नाईक, जलपुरवठा खात्याचे अधिक्षक अभियंता संजय वाळवेकर, कार्यकारी अभियंता जामदार, सहाय्यक अभियंता लेस्टर फर्नांडिस व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. 
या भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी दापट येथे जलकुंभ उभारण्यात आला आहे. हा जलकुंभ कार्यन्वित झाल्यानंतर पाणी पुरवठ्यात सुधारणा होणार असल्याचे अभियंत्यांनी सांगितले. या बैठकीला पाणी समस्या भेडसावणाऱ्या भागातील रहिवासी उपस्थित होते. त्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्‍नाचा भडीमार करून त्यांना भंडावून सोडले. 

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या