ग्रीस येथून आलेल्या सर्व १४५० दर्यावर्दींचा अहवाल निगेटिव्ह

daboli grees retan
daboli grees retan

दाबोळी, : साईप्रस, ग्रीस येथून काल सकाळी 'सेलेब्रिटी इन्फिटी' जहाजामधून आलेल्या सर्व १४५० दर्यावर्दीचा नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने या दर्यावर्दीना घरी क्वॉरंटाईनसाठी पाठवण्याचे काम आज सायंकाळी उशिरा सुरू करण्यात आले. त्यानुसार आज उशिरा रात्री चारशेहून अधिक जणांना सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर घरी क्वारंटाईनसाठी पाठविण्यात आले. दर्यावर्दिंना नेण्यासाठी त्यांचे कुटुंबियांनी बंदराबाहेर गर्दी केली होती.
काल गुरुवारी सकाळी 'सेलेब्रिटी इन्फिनिटी' हे विदेशी पर्यटक जहाज मुरगाव बंदरात १४५० दर्यावर्दीना घेऊन दाखल झाले होते. कोविड-१९ महामारी काळात सायप्रस ग्रीस येथे अडकलेल्या या दर्यावर्दी जहाजातून मुरगाव बंदरात सकाळी ११.३० वाजता आगमन झाले होते. त्यानंतर या सर्व दर्यावर्दी आरोग्य चाचणी व स्वॅब नमुने गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. यासाठी डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी मिळून सुमारे ५० जणांचा गट मुरगाव बंदरात कार्यरत होता. हे जहाज खराब हवामानामुळे उशिरा बंदरात नांगरण्यात आले होते. त्यामुळे सदर दर्यावर्दीयांची आरोग्य चाचणी व नमुने गोळा करेपर्यंत रात्रीचे ९ वाजले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यानंतर या सर्व दर्यावर्दींना जहाजात परत पाठवण्यात आले. 
दरम्यान, आज दर्यावर्दीच्या घेण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यानुसार आता त्यांचे सर्व सोपस्कार पूर्ण करून त्यांना घरी विलगीकरणासाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. सोपस्कर पूर्ण करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते. त्यानुसार आज रात्री उशिरापर्यंत चारशेहून अधिक जणांना घरी पाठवण्यात आले. उर्वरित दर्यावर्दींना उद्या सोपस्कार पूर्ण केल्यानंतर घरी क्वारंटाईनसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर हे जहाज मुरगाव बंदरातून रवाना होणार आहे. 
काल देशांतर्गत विमान सेवेतून दाबोळी विमानतळावर २४४ प्रवाशांचे आगमन झाले तर ३५० प्रवाशांनी याच विमानातून प्रयाण केले. 
देशात लॉकडाऊनमध्ये शीतलता आणून केंद्र सरकारने देशांतर्गत विमान सेवेला चलन दिल्यानंतर आजपर्यंत दाबोळी विमानतळावर दिल्ली, बंगलोर, हैदराबाद, कानपूर, मैसूर या ठिकाणाहून देशांतर्गत विमान सेवेतून शेकडो प्रवाशांची रेलचेल सुरू झाली आहे. त्याच अनुषंगाने काल गुरुवारी दाबोळी विमानतळावर बेंगलोरहून दुपारी १.१५ वाजता आलेल्या (६ ई ३४५) इंडिगो फ्लाईट मधून २५ प्रवासी गोव्यात दाखल झाले. नंतर हेच विमान दुपारी २.१५ वाजता परतीच्या मार्गावर १४३ प्रवाशांना घेऊन बेंगलोरला रवाना झाले. नंतर दुपारी २.३० मिनिटांनी दिल्लीहून आलेल्या (६ई ३६७) या इंडिगो विमानातून १२२ प्रवासी गोव्यात आले. नंतर ३.२० वाजता सदर विमान ११८ प्रवाशांना घेऊन दिल्लीला रवाना झाले. 
दरम्यान, दुपारी १ वाजता हैदराबाद होऊन आलेल्या (६ ई ९०५) या इंडिगो फ्लाइट मधून ९४ प्रवासी गोव्यात दाखल झाले. नंतर याच विमानातून गोव्यातून दुपारी २ वाजता ८० प्रवासी हैदराबादला रवाना झाले. तसेच दुपारी २.५५ वाजता दाबोळी विमानतळावर उतरलेल्या हुबळीहून आलेल्या (६ ई ७९५) या इंडिगो विमानातून ०१ प्रवासी आला नंतर हेच विमान ३.१५ वाजता ०२ प्रवाशांना घेऊन हुबळीकडे रवाना झाले. नंतर ५.४५ वाजता कानपूरहून ०२ प्रवासी घेऊन (६ई ७९८४) इंडिगो विमान दाबोळी विमानतळावर आले. नंतर याच विमानातून ६.१५ वाजता ०६ प्रवासी कानपूरला रवाना झाले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com