पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाठवलेला अहवाल सार्वजनिक करा

अवित बगळे
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

ते म्हणाले, रेव्ह पार्टी उजेडात आल्यानंतर आताच्या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठपुरावा करून हा अहवाल मिळवावा व त्यानुसार कार्यवाही करण्याची सूचना राज्य सरकारला करावी.

पणजी

अमली पदार्थांत गुंतलेले राजकारणी व पोलिस अधिकारी यांच्या संबंधाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवण्यात आलेला अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाचे राज्य सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, रेव्ह पार्टी उजेडात आल्यानंतर आताच्या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठपुरावा करून हा अहवाल मिळवावा व त्यानुसार कार्यवाही करण्याची सूचना राज्य सरकारला करावी.
पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक म्हणाले, पार्टीचे आयोजक कपिल झवेरी याने समाज माध्यमावर सत्ताधाऱ्यांविषयी जे काही लिहिले आहे यावरून त्यांची केवळ वरवरची ओळख नाही तर त्यांचे संबंध खोल आणि दीर्घकाळाचे आहेत हे जाणवते. यामुळे पार्टीला त्यांचा आशिर्वाद नव्हता, असे मानणे थोडे कठीण जाते.

संबंधित बातम्या