प्रजासत्ताक दिन 2021: वाळपई सत्तरीत भूमिपुत्रांचा हुंकार

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

सत्तरी तालुक्यात गोवा मुक्तिपासून जमिन मालकीचा विषय धगधगत असून मेळावली आयआयटी संस्थेच्या निमित्ताने या आंदोलनाला बरीच बळकटी मिळाली आहे.

वाळपई: सत्तरी तालुक्यात गोवा मुक्तिपासून जमिन मालकीचा विषय धगधगत असून मेळावली आयआयटी संस्थेच्या निमित्ताने या आंदोलनाला बरीच बळकटी मिळाली आहे. त्याची प्रचिती आज 26 जानेवारी रोजी दिसून आली. सत्तरी तालुक्यात विविध जमिनीच्या मालकी हक्कावरून लोकांचा आता आवाज वाढत चालला आहे. त्याच धर्तीवर आज मंगळवारी 26 रोजी वाळपईत सत्तरी भूमिपुत्रांचा हुंकार दिसला आहे. वाळपईत आज सत्तरीतील तमाम भुमिपुत्रांनी महारँली काढून सरकारला सज्जड इशारा दिला आहे. आज सकाळी दहा वाजेपासून वाळपई हातवाडा येथे एक एक करुन भुमिपुत्र जमा होऊ लागले. बघतो तर हजारोंच्या संख्येने लोकांची हजेरी झाली. अकरा वाजता महारँलीला सुरुवात झाली. हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आमच्या जमिनी आम्हाला द्या अशा जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. हा हा म्हणता वाळपई बाजारात रँली पोहचली. व तिथे प्रमुख कार्यक्रम संपन्न झाला.

‘देश प्रथम’ संकल्पनेंतर्गत डिचोलीत फडकला तिरंगा -

यावेळी शुभम शिवोलकर यांनी आंदोलनाची रुपरेषा स्पष्ट केली. त्यानंतर राजेश गावकर, विश्वेष प्रभू, दशरथ मांद्रेकर, अँड.शिवाजी देसाई, अँड. गणपत गावकर, रणजीत राणे आदींची भाषणे झाली. यावेळी मान्यवरांनी सरकार विरोधात मोठी आग ओतली. सत्तरीतील भुमिपुत्र आता जागा झाला असून कोणत्याही स्थितीत जमिन मालकी मिळाल्या शिवाय मागे हटणार नसल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी समस्त सत्तरीतील विविध मंदिराचे गावकर मंडळींनी मिळून देवतांना सांगणे करुन जमीन मालकी मिळावी म्हणून प्रार्थना केली.

Tractor Parade: लाल किल्ल्यावर फडकला शेतकरी आंदोलनाचा ध्वज -

 

संबंधित बातम्या