प्रजासत्ताक दिन 2021: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने पणजी येथील परेड ग्राऊंड येथे आज ध्वजारोहण केले. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांना गोवा पोलिसांकडून गार्ड ऑफ ऑनर मिळाला.

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने पणजी येथील परेड ग्राऊंड येथे आज ध्वजारोहण केले. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांना गोवा पोलिसांकडून गार्ड ऑफ ऑनर मिळाला. त्यांनी गोव्यातील जनतेला अभिवादन केले स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय राज्यघटनेची स्थापना करणाऱ्यां महामानवांना आदरांजली वाहिली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गोव्या जनतेला मुख्यमंत्र्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. "ज्यांच्या संघर्ष आणि नि:स्वार्थ त्यागांनी भारताला एक स्वतंत्र देश बनवलं त्या सर्वांना आणि आपली घटना घडविणाऱ्या लोकशाही राष्ट्रात राहण्याचा अधिकार देणाऱ्या अशा सर्व थोर दिग्गजांना मी मनापासून श्रद्धांजली वाहतो." असे ट्विट गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.

दरम्यान भारत आज आपला 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहे. याच दिवशी भारताने 1950 मध्ये भारतीय राज्यघटना स्वीकारली होती. दर वर्षी 26 जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते.हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते.

गोवा विधानसभा अधिवेशन: विधानसभेत घुमला आमका नका गोव्यात कोळसा नाका घोषणांचा आवाज -

त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरु होताच  ष्ट्रपती ध्वजारोहण करतात व 21 तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणिकृ कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या  हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.

संबंधित बातम्या