प्रजासत्ताक दिन 2021: गोव्याच्या या रक्षणकर्त्यांना राष्ट्रपती पदक जाहिर

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

पोलिस खात्यात गेली अनेक वर्षे सेवा बजावणारे विद्यमान पोलिस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर व पोलिस निरीक्षक रवींद्र देसाई यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.

पणजी :  पोलिस खात्यात गेली अनेक वर्षे सेवा बजावणारे विद्यमान पोलिस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर व पोलिस निरीक्षक रवींद्र देसाई यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. त्याच बरोबर गृहरक्षक दलाच्या महिला होमगार्ड मीनाक्षी अनंत कुबल व नयन वेलिंगकर ऊर्फ विजया मातोंडकर यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. मीनाक्षी कुबल व नयना वेलिंगकर या पणजी विभागांमध्ये महिला होमगार्ड म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या चांगल्या सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. 

राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालेले पोलिस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर हे सध्या दक्षिण गोव्याच्या वाहतूक विभागात पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते 1990 साली पोलिस उपनिरीक्षक म्हणून गोवा पोलिस खात्यात भरती झाले. त्यानंतर त्यांना 2000 साली पोलिस निरीक्षक म्हणून बढती मिळाली. 2015 साली ते पोलिस उपअधीक्षक म्हणून पदावर पोचले. त्यापूर्वी शिरवईकर यांना 2012 साली मुख्यमंत्री सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. एक शिस्तबध्द  पोलिस अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. सध्या ते दक्षिण गोव्यात वाहतूक विभागात पोलिस उपअधीक्षक म्हणून काम पाहत आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गोव्याला निघून गेले म्हणत पवारांनी केली नाराजी व्यक्त

राष्ट्रपती पोलिस पदक प्राप्त झालेले रवींद्र देसाई हे सध्या कुडचडे पोलिस स्थानकामध्ये पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. 27 ऑगस्ट 1964 साली काणकोण  येथे जन्माला आलेले रवींद्र देसाई हे ३ सप्टेंबर  1982 रोजी गोवा पोलिसांमध्ये पोलिस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. त्यानंतर १४ जून 2002 रोजी त्यांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून बढती मिळाली.19 डिसेंबर 2011 साली त्यांना मुख्यमंत्री सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. 2013  साली त्यांना पोलिस निरीक्षकपदी बढती मिळाली. 2014 साली ते  कुडचडे पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षक म्हणून रुजू झाले.2020-21 गोव्यातील उत्कृष्ट पोलिस स्थानकाचा मान कुडचडे पोलिस स्थानकाला मिळाला. त्यापूर्वी 2018 साली कुडचडे पोलिस स्थानकाला देशातील पहिल्या दहा उत्कृष्ट पोलिस स्थानकामध्ये स्थान मिळाले. रवींद्र देसाई यांनी अनेक गुन्ह्यांमध्ये तपास अधिकारी म्हणून काम करून गुन्हेगारांना पकडले असून अनेक गुन्ह्याचा शोध लागलेला आहे.दिली.

संबंधित बातम्या