Republic Day: अतिरेक्यांपासून सावधानता बाळगण्यासाठी गोवा पोलिस अर्लट मोडवर

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर अतिरेक्यांपासून सावधानता बाळगण्यासाठी गोवा पोलिसांनी मिरामार येथे ‘मॉकड्रिल’ सुरू केले.
Republic Day|Mockdrill At Miramar
Republic Day|Mockdrill At MiramarDainik Gomantak

Republic Day: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर अतिरेक्यांपासून सावधानता बाळगण्यासाठी गोवा पोलिसांनी मिरामार येथे ‘मॉकड्रिल’ सुरू केले. घटनेच्या ठिकाणी सर्व यंत्रणा वेळेत पोहोचून तेथे नियंत्रण मिळविण्याची प्रात्यक्षिके करण्यात आली.

पर्यटकांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यासाठी आवश्‍यक असलेली तत्परता याबाबत ही तालीम होती. राज्यातील किनारपट्टी परिसरात अशा प्रकारचे मॉकड्रिल 26 जानेवारीपूर्वी करून पर्यटकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

मिरामार येथे आज सायंकाळी 5 वा.च्या सुमारास हे मॉकड्रिल करण्यात आले. त्यामध्ये पोलिसांसह, अग्निशमन दल, अतिरेकीविरोधी पथक, रुग्णवाहिका, गोव्यातील फॉरेन्सिक सायंटिफिक प्रयोगशाळा, श्‍वानपथक कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांनीच बोगस अतिरेकी तयार करून त्यांच्याविरुद्ध कारवाईची तालीम करण्यात आली.

Republic Day|Mockdrill At Miramar
Goa Tourism Department: पर्यटन खात्याचा हेली जॉय राईड्स उपक्रम नेमका आहे तरी काय?

बोगस अतिरेक्यांपाशी असलेल्या बॅगेची बॉम्ब पथक तसेच श्‍वानपथकाकडून तपासणी करण्यात आली. अग्निशमन दल वाहन या घटनेची माहिती मिळताच काही मिनिटांतच मिरामार येथे पोहोचले.

तसेच इतर पथकेही लवकरात लवकर पोहोचली व त्यानंतर ही कारवाई सुरू झाली. ही कारवाई पणजी पोलिस स्थानकाच्या मदतीने करण्यात आली. यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी मार्गदर्शन केले.

Republic Day|Mockdrill At Miramar
Sunburn Festival 2023: सनबर्न आयोजकांविरुद्ध कारवाई होणार का ?

अतिरेक्यांना रोखण्यास गोव्याचे अतिरेकीविरोधी पथक सक्षम आहे. अतिरेक्यांना सामोरे जाण्यासाठी जी काही उपकरणे कमांडोजना लागतात ती अत्याधुनिक आहेत. पुढील दिवसांत कळंगुट, हणजूण व पेडणे या पोलिस स्थानकांच्या क्षेत्रात अशा प्रकारचे मॉकड्रिल करण्यात येतील.- निधीन वाल्सन, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com