Child Beggars: म्हापशात भिक मागणाऱ्यांची चाईल्डलाईनतर्फे सुटका

म्हापसा येथील मार्केटमध्ये भीक मागणाऱ्या दोघी युवतींची चाईल्डलाईन या संस्थेने म्हापसा पोलिसांच्या साहाय्याने सुटका केली.
Beggars |
Beggars |Dainik Gomantak

Beggars in Mapusa: म्हापसा येथील मार्केटमध्ये भीक मागणाऱ्या दोघी युवतींची चाईल्डलाईन या संस्थेने म्हापसा पोलिसांच्या साहाय्याने सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी पिडितींची आई व चुलत बहीण विरोधात गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी चाईल्डलाईनचे शेन काल्देरा यांनी तक्रार दाखल केली. म्हापसा मार्केटमध्ये एका 14 वर्षीय आणि 19 वर्षीय या दोन युवती भीक मागत असल्याचे फिर्यादींना आढळले. या दोन्ही युवतींची सुटका करून संस्थेने त्यांची मेरशी येथे सुधारगृहात रवानगी केली.

या दोघीही युवती मूळ उस्मानाबाद-महाराष्ट्र येथील. त्या बोडगिणी म्हापसा येथे वास्तव्यास होत्या. पिडीतींची संशयित आई शारदाबाई पवार व चुलत बहिण बली शंकर काळे यांनी त्यांना मार्केटमध्ये भीक मागायला लावले होते.

Beggars |
Goa Police: प्रशासनाची मोठी कारवाई; पाच वर्षांत तब्बल 127 पोलिस निलंबित

फिर्यादींच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी बाल न्याय कायदा 2015, गोवा भीक मागणे प्रतिबंधक कायदा 1972चे कलम 11 या अंतर्गत पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com