प्रभागचं आरक्षण,फेररचना निवडणूक जाहीर व्हायच्या तीन आठवड्यांआधी होणार

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

राज्यातील पालिकांची निवडणूक अधिसूचना जारी करण्याच्या तीन आठवड्यापूर्वी प्रभाग आरक्षण व फेररचना जाहीर करण्याची माहिती सरकारने दिल्याने उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सुजय लोटलीकर याने सादर केलेली याचिका निकालात काढली. 

पणजी :  राज्यातील पालिकांची निवडणूक अधिसूचना जारी करण्याच्या तीन आठवड्यापूर्वी प्रभाग आरक्षण व फेररचना जाहीर करण्याची माहिती सरकारने दिल्याने उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सुजय लोटलीकर याने सादर केलेली याचिका निकालात काढली. 

 सरकारने प्रभाग आरक्षण व फेररचना निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी घोषित करण्याची तरतूद केली जावी, असे निरीक्षण आदेशात केली आहे.
 गोवा सरकारने जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी प्रभाग आरक्षण व फेररचनाची अधिसूचना जारी करून लगेच निवडणूक कार्यकारी गोवा निवडणूक आयोगाने केला होता. त्यामुळे उमेदवार व मतदारांनाही त्याला आक्षेप घेण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये पालिका निवडणुकांची मुदत संपल्याने त्यावर प्रशासक नेमण्यात आला. या निवडणुकीतही जिल्हा पंचायतप्रमाणेच घाईघाईने आरक्षण व फेररचना जाहीर करू नये, यासाठी सुजय लोटलीकर याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर केली होती. या याचिकेत पालिका निवडणुकीवेळी आरक्षण व फेररचना अधिसूचना किमान एक महिना आधी काढण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली होती. यासंदर्भातील दोन वेगवेगळ्या याचिका सादर करण्यात आल्या होत्या. 

संबंधित बातम्या