शिरसई उपसरपंचपदी रेश्मा पार्सेकर

Sudesh Arlekar
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

शिरसई पंचायतीच्या उपसरपंचपदी रेश्मा पार्सेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे या पंचायत मंडळावरील माजी आमदार किरण कांदोळकर यांचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

म्हापसा
या पंचायतीच्या सरपंचपदी कांदोळकर यांचे कट्टर समर्थक आनंद तेमकर कार्यरत असून त्यांच्याच गटातील रेश्मा पार्सेकर यांची सध्या उपसरपंचपदी निवड झाली आहे.
या सात सदस्यीय पंचायतीच्या उपसरपंचपदावरून गितिशा कांदोळकर यांनी सर्व पंच सदस्यांमध्ये झालेल्या अलिखित करारानुसार राजीनामा दिला होता. त्यामुळे ते पद रिक्त होते.
उपसरपंच निवडीसाठी झालेल्या बैठकीस पार्सेकर यांच्या व्यतिरिक्त सरपंच आनंद तेमकर, तसेच गोकुळदास कांदोळकर, दिनेश फडते, गितिशा कांदोळकर असे एकूण पाच पंचायत सदस्य उपस्थित होते. विराज गडेकर व लक्ष्मीकांत परब हे दोन पंचायत सदस्य बैठकीस अनुपस्थित होते.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून गट विकास अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी मनोहर परवार यांनी बैठकीचे कामकाज हाताळले. त्यांना पंचायत सचिव पूजा गावस व अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी पंचायत कार्यालयात किरण कांदोळकर यांचीही उपस्थिती होती.

संपादन - यशवंत पाटील

 

संबंधित बातम्या