Chinchinim : महामार्गामुळे त्रस्त चिंचोणेवासीयांची सरदेसाईंकडे धाव! मदतीचे केले आवाहन

फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे महामार्ग स्थलांतरित करण्याची ग्रामस्थांची विनंती
Chinchinim
ChinchinimDainik Gomantak

मडगाव (खास प्रतिनिधी) : राष्ट्रीय हमरस्ता विस्तारामुळे भोमा आणि खोर्ली येथील नागरिक चवताळलेले असतानाच आता दक्षिण गोव्यात दांडीवाडो चिंचोणे येथील याच कारणास्तव रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय हमरस्ता 66 अ साठी आता या भागात आणखी जमीन संपादित करण्यासाठी सरकारने नोटीस जारी केल्याने लोक आणखीनच भयभीत झाले आहेत.

दांडीवाडो चिंचोणे हा अत्यंत दाट लोकवस्तीचा भाग असून हा रस्ता या दाट लोकवस्तीतून न न नेता त्यासाठी बगल रस्त्याचा पर्याय अवलंबावा अशी स्थानिकांची मागणी आहे. या रस्त्या संपुर्ण गाव मधोमध विभागला जाणार आहे. त्याशिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी 45 मिटर जागा सेटबॅक म्हणून ठेवली जाणार असल्याने गावात बांधकामासाठी जागाच शिल्लक राहणार नाही असा लोकांचा दावा आहे.

Chinchinim
Goa Politics: भाजपमधून घराणेशाहीला विरोध; आता कामतांचे काय होणार ?

आज या गावातील लोकांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची भेट घेऊन त्यांच्या समोर आपले घाऱ्हाणे मांडले. यावेळी त्यांच्या बरोबर स्थानीक सरपंच वालेंतीन बार्रेटो, उपसरपंच शर्मिला ग्रेसियस, पंच कॉलिन परेरा व फ्रँक विएगस हे उपस्थीत होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना सरपंच बार्रेटो यांनी सांगितले, आम्ही या रस्त्याला पर्यायी बगल रस्त्याची जागा सुचविली आहे. तसा ग्रामसभेने ठरावही घेतला आहे.आम्ही केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जेव्हां गोव्यात आले होते त्यावेळी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली होती पण सरकारकडून आम्हाला अजूनही आवश्यक तो प्रसिसद मिळालेला नाही असे त्यांनी सांगितले.

मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारात मंत्री असलेले विजय सरदेसाई यांनी या पर्यायी बगल रस्त्याला मंजूरी मिळवून दिली होती. मात्र सरदेसाई सत्तेबाहेर गेल्यावर हा पर्याय गुंडाळून ठेवण्यात आला असे बार्रेटो यांनी सांगितले. या भागात सरकार उड्डाणपुल बांधून हमरास्ता बांधू पाहत आहे.

या संबंधी बोलताना सरदेसाई यांनी, हे डबल इंजिन सरकार लोकांना विश्वासात न घेता आपल्याला हव्या तशा स्वरुपात विकास लोकांच्या माथी मारू पाहत आहे. भोमा येथे जे सरकारं करते तेच येथेही करू पाहते. सरकारला स्वस्तातला पर्याय देऊनही तो न स्वीकारता हा खर्चिक प्रकल्प पुढें रेटू पाहत आहे ते कंत्राटदारांचा फायदा करून देण्यासाठी का असा सवाल केला.

या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी दिल्लीत मंत्र्याकडे जाण्याची आपली तयारी आहे असे सांगत तिथेही काम झाले नाही तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा पर्यायही आम्ही खुला ठेवला आहे असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com