बायंगिणीतील जागा कचरा टाकण्यासाठी ताब्यात घेण्याचा ठराव  मंजूर

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

बायंगिणी येथील प्रस्तावित कचरा प्रकल्पाला दिलेल्या १ लाख ७० चौरस मीटर जागेपैकी कचरा व्यवस्थापन महामंडळाने देऊन केलेली ४ हजार चौरस मीटर जागा सध्यातरी कचरा टाकण्यासाठी ताब्यात घेण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला.

पणजी :  बायंगिणी येथील प्रस्तावित कचरा प्रकल्पाला दिलेल्या १ लाख ७० चौरस मीटर जागेपैकी कचरा व्यवस्थापन महामंडळाने देऊन केलेली ४ हजार चौरस मीटर जागा सध्यातरी कचरा टाकण्यासाठी ताब्यात घेण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. बायंगिणी प्रकल्पाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, त्या प्रकल्पाची निविदा प्रक्रियाही थांबलेली नाही,  त्यामुळे कसल्याही परिस्थितीत बायंगिणीचा कचरा प्रकल्प होणे आवश्‍यक आहे. दरम्यान, शहरातील दुकानदारांना कोरोना महामारीच्या काळात चार महिन्यांची शुल्क माफी द्यावी, अशी मागणी करण्याच आली. परंतु त्यावर पुढील बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.

महापौर मडकईकर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या सभागृहात झालेल्या सभेला उपमहापौर वसंत आगशीकर, आयुक्त संजित रॉड्रिग्स, मुख्य कार्यकारी अभियंता पार्सेक, इतर सर्व अधिकारी व पदाधिकारी आदी उपस्थित होते. 
सभेच्या सुरुवातीला मेट्रो या दुकानांचा विषय चर्चेत आला, त्यावर आयुक्त रॉड्रिग्स यांनी कारवाई करण्यासाठी अकाऊंट अधिकारी येतही नाही, कोणी कोणते काम करायला हवे. त्यानंतर नगरसेवक हळर्णकर यांनी गाडेधारकांचा विषय मांडला आणि महापौर-हळर्णकर यांच्यात जुंपली. यावेळी सुरेंद्र फुर्तादो यांनी बिग डॅडीचा मुद्दा उचलत हळर्णकर-महापौर यांच्या वादाला फुंकर घातली. डिक्रुझ यांनी महापौर मंडकईकर यांनी सतत निर्णय फिरवू नयेत, असा सल्ला दिला. त्यासाठी त्यांनी नरकासूर ५ फुटावरू ८ आणि आता आठ फुटावरून पुढे कितीही उंची असेल असे सांगितले.

यावेळी टोईंग वाहनाविषयीची निविदा काढण्याचा ठराव मंजूर झाला. बेकायदेशीर पार्किंगमधील दुचाकीसाठी ६०० रुपये, तर चार चाकी वाहनांसाठी ८०० रुपये आणि कसिनो  कार्यालयाच्या परिसरातील बेकायदेशीर वाहनांसाठी १५०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच पे-पार्किंगची निविदा भरणाऱ्या जुवारकर असोसिएट्स या कंपनीला टाळेबंदीमुळे परतीचे सव्वासहा लाख रुपये देण्याचा ठरावही मंजूर झाला.  महापालिकेच्या मार्केट इमारतीतील मेट्रो या दुकानाच्या चाललेल्या नूतनीकरणाच्या मुद्द्यावर माजी महापौर तथा नगरेसवक वैदही नाईक, रुपेश हळर्णकर, मिनीन डिक्रुझ यांनी प्रश्‍न उपस्थित केले.

संबंधित बातम्या