‘जनमन उत्सव’ सर्वेक्षणाला दाबोळी, फातोर्ड्यात प्रतिसाद

महिलांच्या आकांक्षा जाणून घेवूया, आईची आशा ठरवेल गाेव्याची दिशा
‘जनमन उत्सव’ सर्वेक्षणाला दाबोळी, फातोर्ड्यात प्रतिसाद
जनमन उत्सवDainik Gomantak

मडगाव: महिलांच्या आकांक्षा जाणून घेऊन त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने ‘गोमन्‍तक’ने हाती घेतलेल्या एकमेवाद्वितीय असलेल्या ‘जनमन उत्सव’ सर्वेक्षणाला सोमवारी वास्को, दाबोळी आणि फातोर्डा या तीन ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जनमन उत्सव
जनमन उत्सवDainik Gomantak

गोव्यातील महिलांना त्यांचे स्वतःचे असे व्यासपीठ तयार करून देण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण हाती घेतले असून, महिलांना राज्याची प्रगती कशी केलेली हवी आहे हे जाणून घेण्याच्या उद्दिष्टाने हे सर्वेक्षण होणार आहे.

जनमन उत्सव
जनमन उत्सवDainik Gomantak

या सर्वेक्षणात मुरगाव पालिकेच्या प्रभाग 15च्या नगरसेविका प्रिया नंदादीप राऊत सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमाचे कौतुक करताना हा उपक्रम काळाची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. दाबोळी येथील महिला मंडळातील सदस्य, स्वयंसेवी गटांतील महिला तसेच गृहिणींनी व फातोर्डा येथे गवळीवाडा आणि चंद्रवाडा येथील महिलांनी या सर्वेक्षणात भाग घेतला.

Related Stories

No stories found.