मद्य विक्रीच्या वाढीव वेळेला रेस्टॉरंट बार मालकांचा आक्षेप

मद्य विक्रीच्या वाढीव वेळेला रेस्टॉरंट बार मालकांचा आक्षेप

पणजी, 

टाळेबंदीच्या अटी शिथील झाल्याने राज्यात मद्य विक्री करणाऱ्या दुकानांना परवानगी दिली गेली. परंतु ही मद्यविक्री आता रात्री आठवाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. रेस्टॉरंट-बार वाल्यांना व्यवसाय करण्यास परवानगी मिळत नाही आणि दुकानांना विक्रीस वाढीव वेळ दिल्याने त्यांनी त्यास आक्षेप घेतला आहे. याविरोधात शहरातील काही रेस्टॉरंट-बार मालकांच्यावतीने आज याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. 
रेस्टॉरंट-बार सुरू होण्यासाठी मालकांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना या पूर्वी निवेदनही दिले आहे. परंतु राज्य सरकार ८ जूनची वेळ पाहत आहे. आठजूनंतर नवी मार्गदर्शक तत्वे लागणार असली तरी राज्य सरकारला स्वतःच्या अधिपत्याखाली रेस्टॉरंट-बार, जीम व मॉल सुरू करण्यास परवानगी देणे शक्य आहे. परंतु राज्य सरकार पाचवा टाळेबंदीचा काळ सुरू झाल्याने केंद्र सरकारने ठरविलेली ८ जूनचीच तारीख पकडून पुढे चालली आहे. मद्य विक्रेत्यांना दुकाने खुली ठेवण्यासाठी सायंकाळी सातच्या आतील वेळ दिली होती. परंतु दुकाने आठ वाजेपर्यंत खुली राहणार असल्याने त्यास रेस्टॉरंट-बार मालकांनी आक्षेप घेतला आहे. 
विशेष बाब म्हणजे रेस्टॉरंट-बार असोसिएशनमध्ये असणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांची मद्य विक्रीची दुकाने असल्याने त्यांना बार चालू झाला काय आणि बंद असला काय, याचे काही पडलेले नाही. परंतु जे पूर्णतः रेस्टॉरंट-बार हाच व्यवसाय करतात, त्यांच्यासमोर अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहे. आता चार दिवस बाकी राहिले तरी रेस्टॉरंट खुले होतील, असे वाटत आहे. परंतु बार खुले करण्याबाबत काय निर्णय होणार, हे चार दिवसानंतरच कळेल. मद्य विक्रेत्यांची दुकाने जर ८ वाजेपर्यंत खुली राहत असतील, तर बार चालू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन आज रेस्टॉरंट--बार मालकांच्यावतीने मुख्यमंत्र्यांनी दिले जाणार असल्याची माहिती सूरज चोडकणर यांनी दिली आहे. 

 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com