रेस्टॉरंट सुरू होणार, पण ‘बार'चे काय?

Dainik Gomantak
सोमवार, 1 जून 2020

बार-रेस्टॉरंट मालकांपुढे प्रश्‍न ः राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

विलास ओहाळ
पणजी

देशभरासह राज्यात पाचवी टाळेबंदी लागू झाली आहे. गोव्याचा हरित पट्ट्यात समावेश झाल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. आता ८ जूनपासून हॉटेल, रेस्टॉरंट सुरू होतील, असे जाहीर झाले आहे. परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील नॉनव्हेज रेस्टॉरंटमध्ये बार आहेत. ते बार खुले होणार की नाही, याची चिंता आता व्यावसायिकांना लागून राहिली आहे. त्यामुळे राज्य सरकार आपल्या मार्गदर्शक तत्त्वात बार ॲण्ड रेस्टॉरंट खुली करण्यास परवानगी देणार काय, याकडे या व्यवसायातील मालकांना लागून राहिली आहे.
राज्यात बार ॲण्ड रेस्टॉरंटची संख्या सुमारे ३०० ते ४०० च्या आसपास आहे. मांसाहारी जेवण विक्री करणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये बार हा असतोच नाहीतर ती त्या व्यवसायाची गरज बनलेली आहे. शाकाहारी रेस्टॉरंट चालविणाऱ्यांशी बारचा काही संबंध येत नाही. त्यामुळे त्यांना बार सुरू झाले काय आणि बंद राहिले काय, दोन्हीही बाबी सारख्याच. हॉटेल, रेस्टॉरंट, जीम आणि मॉल कधी सुरू होणार याकडे राज्यातील या व्यवसायाशी निगडीत सर्व घटकांचे लक्ष लागून होते. आता ८ जूनपासून हे व्यवसाय सुरू होतील. पणत्यासाठी काही अटी व नियम असणार आहेत, ते अद्याप जाहीर झालेले नाहीत.
राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट जरी चालू झाले, तरी केवळ शाकाहारी पदार्थ विक्री करणाऱ्यांना तो व्यवसाय सुरू होणे महत्त्वाचे होते. परंतु दुसरीकडे मात्र जे मांसाहारी जेवण पुरवितात, त्या रेस्टॉरंटवाल्यांना`आपला ‘बार' चालू होणार याविषयी चिंता सतावू लागली आहे. कारण अद्याप ‘बार'चा स्पष्ट उल्लेख कोठेही आला नाही. दुसरीकडे केंद्र सरकारने दारूची घाऊक विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे बाहेरून दारू पिऊन तर्रर्र झालेला ग्राहक रेस्टॉरंटमध्ये जेवायला येणार काय, असा सवाल पणजीतील बार ॲण्ड रेस्टॉरंटचे मालक अॅँडी रॉर्ज यांनी ‘गोमन्तक'शी बोलताना व्यक्त केला.

बार ॲण्ड रेस्टॉरंट चालविणाऱ्या मालकांनी पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना याविषयी निवेदन दिले आहे. मांसाहारी जेवण देणारे रेस्टॉरंट सुरू ठेवायचे झाल्यास तेथील बार सुरू करण्यास परवानगी देणे अपेक्षित आहे. बाहेरून दारू पिऊन जेवणास लोक येतील आणि ही बाब अशोभनीय आहे. अगोदरच रेस्टॉरंट कसे-बसे व्यावसायिक सुरू करणार आहेत, त्यातच ‘बार'विषयी राज्य सरकारने आपल्या मार्गदर्शक तत्त्वात मान्यता द्यावी, अशी सर्व व्यावसायिकांची मागणी आहे.
- दाद देसाई, मालक रिट्झ हॉटेल समूह.

 

Goa Goa Gos

संबंधित बातम्या