गोमन्तकच्या ‘कौन बनेगा आमदार’चा निकाल जाहीर, विजेत्यांची यादी एका क्लिकवर

38 जागांचे निकाल अचूक: पेडणे येथील अनिकेत सावंत प्रथम
कौन बनेगा आमदार
कौन बनेगा आमदारDainik Gomantak

पणजी: मार्चमध्ये झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीसंदर्भात गोमन्तक समूहाने घेतलेल्या ‘कौन बनेगा आमदार’ स्पर्धेचा निकाल हाती आला आहे. या स्पर्धेत पेडणे येथील अनिकेत सावंत यांनी पहिले बक्षीस मिळालेल्या एका स्पर्धकाने तर 40 पैकी 38 मतदारसंघांचा अंदाज अचूक वर्तवला.

विधानसभेसाठी अटीतटीच्या निवडणुकीचे भाकित भल्याभल्या राजकीय विश्‍लेषकांना लावता आले नव्हते. देशातील प्रमुख माध्यम समूहांनाही गोव्याचे राजकीय भवितव्य वर्तवणे शक्य झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर या स्पर्धेमुळे गोव्यातील आम जनता निवडणुकीसंदर्भात कसा विचार करते, याचा अंदाज करता येऊ शकतो. या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळालेल्या एका स्पर्धकाने तर 40 पैकी 38 मतदारसंघांचा अंदाज अचूक वर्तवला आहे. दुसरे बक्षीस मिळालेल्या व्यक्तीने ३६ मतदारसंघांबद्दल भाकीत वर्तवले; तर तिसऱ्या क्रमांकाच्या दोन स्पर्धकांनी प्रत्येकी ४० पैकी ३२ मतदारसंघांत कोण जिंकून येईल, हे अचूक सांगितले.

कौन बनेगा आमदार
राष्ट्रीय सबज्युनियर हॉकी स्पर्धेत पंजाब संघाची गोव्यावर मात

निवडणूक मतदानापूर्वी डिचोली, थिवी, म्हापसा, शिवोली, साळगाव, हळदोणे, पणजी, ताळगाव, सांतआंद्रे, कुंभारजुवे, साखळी, प्रियोळ, फोंडा, मुरगाव, दाबोळी, कुठ्ठाळी, कुडतरी, बाणावली, नावेली, केपे, कुडचडे, सांगे या मतदारसंघांत तर भल्याभल्यांना काय होईल, याचा अंदाज लावता येत नव्हता.

पहिले बक्षीस मिळालेल्या अनिकेत अविनाश सावंत यांनी डिचोलीत डॉ. चंद्रकांत शेट्ये, थिवीमध्ये नीळकंठ हळर्णकर, म्हापशात ज्योशुआ डिसोझा, साळगावमध्ये केदार नाईक, हळदोणे येथे कार्लुश फेरेरा, मुरगाव - संकल्प आमोणकर, कुठ्ठाळी - आंतोनिओ वाझ, कुडतरी - रेजिनाल्ड, बाणावली - व्हेंजी व्हिएगश, नावेली - उल्हास तुयेकर, केपे - एल्टन डिकॉस्ता यांचे विजेते म्हणून खूण केली आहे. सांतआंद्रेमध्ये आम्ही जरी विजेता उमेदवार विरेश बोरकर यांचे यादीमध्ये नाव दिलेले नसले तरी सावंत यांनी इतरांच्या जागेवर खूण केली. यावरून त्यांचे राजकीय कौशल्य दिसून येते.

फोंड्यामध्ये मात्र त्यांनी केतन भाटीकर विजयी होतील व सांगेमध्ये त्यांनी सावित्री कवळेकर यांना पसंती दिली होती. (गोमन्तक टीव्हीवर सर्व चार विजेत्यांबरोबरची चर्चा श्रोत्यांना लवकरच पाहायला मिळेल.

कौन बनेगा आमदार
अधिमान्यतेवरून 'गोव्यातील' डॉक्टर संघटनेत तीव्र वाद सुरू

तीन क्रमांक जाहीर

स्पर्धेत पेडणे येथील अनिकेत सावंत याला 38 मतदारसंघांत विजयी उमेदवारांचे भविष्य वर्तवल्याबद्दल पहिले बक्षीस प्राप्त झाले आहे. दुसरा क्रमांक महेश गावस या पर्वरी येथील वाचकाला प्राप्त झाला आहे. त्याने 36 मतदारसंघांतील उमेदवारांचे भविष्य ओळखले होते. तिसऱ्या क्रमांकासाठी दोन दावेदार असून, शैलेंद्र परब (माशेल) व प्रज्ञा तुळसकर (पर्वरी) यांनी 32 मतदारसंघांचे अचूक भविष्य वर्तवले आहे.

अंदाज वर्तविणे कठीण

मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत अनेक पक्ष उतरल्याने अंदाज वर्तवणे तसे सोपे नव्हते. आम आदमी पक्ष तसेच रेव्होल्युशनरी गोवन्स यांना नक्की किती जागा मिळतील, शिवाय ते कोणाची मते फोडतील, याचे अवलोकन करणे कठीण झाले होते. अनेक पक्ष व उमेदवार निवडणुकीत उतरल्यामुळे यावेळी कधी नव्हे ती जोरदार चुरस निर्माण झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com