निवृत्त शिक्षक सुनील तेली यांचा कुशे विद्यालयातर्फे गौरव

वार्ताहर
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

आसगाव बार्देश येथील ज्ञानप्रसारक मंडळ संचलित कुशे उच्च मा. विद्यालयाचे निवृत्त शिक्षक सुनील तेली यांचा कुशे उच्च मा. विद्यालयाच्या पालक शिक्षक संघातर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह भेट देऊन पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष महेश स्वार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

थिवी: आसगाव बार्देश येथील ज्ञानप्रसारक मंडळ संचलित कुशे उच्च मा. विद्यालयाचे निवृत्त शिक्षक सुनील तेली यांचा कुशे उच्च मा. विद्यालयाच्या पालक शिक्षक संघातर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह भेट देऊन पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष महेश स्वार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य देवेंद्र केनावडेकर, प्रभारी उपप्राचार्य सुभाष कौठणकर, व्यावसायिक शाखेचे प्रभारी उपप्राचार्य सुभाष नेरूर, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रा. उमेश कोलवाळकर, सचिव प्रा. दीपक पालसरकर, तसेच सत्कारमूर्ती सुनील तेली उपस्थित होते. 

सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पालक शिक्षक संघाने शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प व स्‍मृती भेट देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षक  व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रा. सुनील तेली यांना स्मृती भेट देण्यात आली. 

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या तसबिरीला हार घालण्यात आला. अध्यक्ष महेश स्वार यांनी स्वागत केले. प्रभारी प्राचार्य देवेंद्र यांनी शिक्षकदिनानिमित्त आपले विचार मांडले. प्रभारी उपप्राचार्य सुभाष कौठणकर यांनी सत्कारमूर्तींची ओळख व सत्कारमूर्तीच्या वतीने त्यांचे मनोगत वाचून दाखवले. प्रा. रिचा खोर्जुवेकर यांनी आभार मानले. तर प्रा. अंकिता गोवेकर व प्रा. रोहन मणेरकर यांनी सूत्रसंचालन केले.

संबंधित बातम्या