हंगामी परप्रांतीय कामगाराना परतीचे वेध

Dainik gomantak
बुधवार, 27 मे 2020

गेल्या आठवड्यात अंदाजे ५० पेक्षा जास्त कामगार वर्गगावी परतले आहेत. या सगळ्याजणांनी पंचायत दरबारी नोंदणी केली असून रेल्वेची सोय झाल्यानंतर कळविले जाईल, असे मनालीतील कामगार तेरसिंग यांनी सांगितले. देशातील पर्यटन हंगाम सध्या निराशेच्या गर्तेत असून टाळेबंदी उठल्यावरच किमान पर्यटन हंगाम सुरू होऊ शकतो, असे कामगारांनी सांगितले.

हरमल  कोविडच्या पार्श्वभूमीवर सध्या टाळेबंदी असल्याने पर्यटन हंगाम आटोपल्यात जमा आहे. हंगामी परप्रांतीय कामगारांना परतीचे वेध लागले असून पंचायत दरबारी नोंद असून, कॉल येण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, सध्या वेळच जात नसल्याने किनारी भागांत, युवक हॉलीबॉल खेळात दंग असल्याचे दिसत आहे.
विशेषतः खासगी रेस्टॉरंट व शॅक्स तसेच अन्य आस्थापनात काम करणारे कामगार हिमाचल प्रदेश, मनाली, लेह, रोहटांग तसेच कुलू व दिल्ली तसेच नेपाळ आदी भागांतील कामगार सध्या वेळे घालविण्यासाठी खेळात रमलेले आहेत. बाखीया भाटात क्रीडा मैदान उभारले असून सध्या बारा खेळाडू वगळता आणखीन २० - २५ खेळाडू संधीची वाट पाहत असतात. मात्र, अधिकाधिक खेळाडू एक दोन गेम खेळून आनंद लुटताना दिसतात.
गेल्या आठवड्यात अंदाजे ५० पेक्षा जास्त कामगार वर्गगावी परतले आहेत. या सगळ्याजणांनी पंचायत दरबारी नोंदणी केली असून रेल्वेची सोय झाल्यानंतर कळविले जाईल, असे मनालीतील कामगार तेरसिंग यांनी सांगितले. देशातील पर्यटन हंगाम सध्या निराशेच्या गर्तेत असून टाळेबंदी उठल्यावरच किमान पर्यटन हंगाम सुरू होऊ शकतो, असे कामगारांनी सांगितले.
 
संबंधित बातम्या